सलमान खानने तोडली किसींग सीन न देण्याची शपथ? कॅटरिना कैफसोबत केले लिप लॉक??
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:40 IST
मी स्वत: कधीच चित्रपटात किसिंग सीन देत नाही, असे सलमानने सांगितले होते. पण कदाचित आता आपला हा निश्चय सलमान तोडू पाहतोय. हे आम्ही नाही तर हा ताजा व्हिडिओ सांगतोय.
सलमान खानने तोडली किसींग सीन न देण्याची शपथ? कॅटरिना कैफसोबत केले लिप लॉक??
सलमान खानने कधीच कुठल्या अभिनेत्रीला आॅन स्क्रीन किस केलेले नाही. यामागचे कारण आम्ही तुम्हाला सांगितले होतेचं. ‘मैने प्यार किया’ या सिनेमाच्या सेटवर असे काही घडले की सलमानने यानंतर कधीच आॅनस्क्रीन किस करणार नाही, अशी जणू शपथचं सलमानने घेतली. या चित्रपटात सलमान व भाग्यश्रीचा एक किस सीन होता. मात्र भाग्यश्रीने किस सीन द्यायला नकार दिला होता. मग काय,भाग्यश्रीच्या नकारानंतर निर्मात्यांनी दोघांमध्ये मिरर ठेवून कसा बसा हा सीन पूर्ण केला होता. त्यानंतर सल्लू मियाँने चित्रपटात कधीही किसिंग सीन न देण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडे एका मुलाखतीत सलमानने किसिंग सीन न देण्याबाबतचा खुलासा केला होता. ब-याचदा मी कुटुंबीयांसोबत बसून चित्रपट बघतो. चित्रपटातील इंटिमेट सीन्स पाहून मला नेहमीच अनकंम्फर्टेबल वाटते. त्यामुळे मी स्वत: कधीच चित्रपटात किसिंग सीन देत नाही, असे सलमानने सांगितले होते. आता ही इतकी मोठी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे, आपला हा निश्चय सलमान कदाचित तोडू पाहतोय. हे आम्ही नाही तर हा ताजा व्हिडिओ सांगतोय. हा व्हिडिओ सलमानच्या ‘टागयर जिंदा है’ या आगामी चित्रपटातील ‘दिल दिया गल्ला’ या गाण्याचा आहे. या रोमॅन्टिक गाण्यात सलमान व कॅटरिना कैफची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री दिसतेय. यात सलमान कॅटरिनाला आॅलमोस्ट किस करताना दिसतोय. आता हा सीन ‘चिट सीन’ आहे की ‘ओरिजनल’ आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. ALSO READ : सलमान खान आणि कॅटरिना कैफ करताहेत ‘‘स्वॅग से स्वागत...’!!सध्या ‘टायगर जिंदा है’मुळे सलमान चर्चेत आहे. ‘टायगर जिंदा है’हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. सलमान व कॅटरिना कैफचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट कबीर खानने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता. पण ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे. ‘टायगर जिंदा है’हा चित्रपट यशराज बॅनरचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट आहे १४० कोटी.