ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चा आजही रंगल्याच्या पाहायला मिळतात. 'हम दिल दे चुके सनम' सिनेमाच्या सेटवर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर ते पुन्हा कधीच एकत्रही दिसले नाहीत. मात्र, ऐश्वर्याला मुलगी झाल्यानंतर सलमान खानने प्रतिक्रिया दिली होती. आता इतक्या वर्षांनंतर एका पत्रकाराने याचा खुलासा केला आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाच्या पॉडकास्टमध्ये पत्रकार हीना कुमावत यांनी हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी सलमान आणि ऐश्वर्याबाबत हा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, "ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिल्यानंतर २-३ दिवसांनी सलमान खान एका मोबाईल कंपनीचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून इंटरव्ह्यू देत होता. त्याला ऐश्वर्या आणि अभिषेकला मुलगी झाल्याबद्दल विचारावं असा दबाव मीडियावर होता. ऐश्वर्याचं लग्न झालं होतं. आणि सलमानसोबत तिचं कोणतंच नातं नव्हतं. त्यामुळे त्याला याबाबत विचारणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी प्रश्न विचारण्यास नकार दिला होता".
"सगळ्यांनी त्याला त्याबाबत प्रश्न विचारले. पण मी तसा कोणताच प्रश्न त्याला विचारला नाही. त्यानंतर काहीच दिवसांत सोहेल खानला मुलगा झाला. त्यावेळी मी सलमानला विचारलं होतं की काका बनल्यानंतर आता तुला कसं वाटतंय? तेव्हा तो म्हणाला होता की मी फक्त काकाच नाही तर मामाही झालो आहे. मी प्रार्थना करतो की त्यांना ११ मुलं होऊ दे", असंही पुढे त्यांनी सांगितलं. ऐश्वर्याने १६ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. ऐश्वर्या-अभिषेकने लेकीचं नाव आराध्या असं ठेवलं आहे.
Web Summary : Years after Aishwarya Rai's daughter's birth, a journalist revealed Salman Khan's reaction. He humorously stated he was an uncle and maternal uncle, wishing they have eleven children.
Web Summary : ऐश्वर्या राय की बेटी के जन्म के कई सालों बाद, एक पत्रकार ने सलमान खान की प्रतिक्रिया का खुलासा किया। उन्होंने मजाकिया अंदाज में कहा कि वह चाचा और मामा दोनों हैं, और उन्होंने उनके ग्यारह बच्चे होने की कामना की।