डेजीने ‘जय हो’नंतर ‘हेट स्टोरी-३’मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. या चित्रपटात तिने जबरदस्त बोल्ड सीन दिले आहेत. डेजीच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास, तिने ‘जय हो’ अगोदर सलमान खानसोबत एका चित्रपटात काम केले आहे. ही बाब फारच कमी लोकांना माहिती आहे. वास्तविक डेजी अभिनेत्री बनण्याअगोदर बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करीत होती. तिला सुरुवातीपासूनच डान्सची आवड आहे. एक दिवस बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे डेजीकडे लक्ष गेले. पुढे त्यांनी तिला त्यांच्या डान्सिग ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.
पुढे डेजीने तब्बल दोन वर्षे गणेश आचार्य यांच्या ग्रुपमध्ये डान्सर म्हणून काम केले. पुढे त्यांची डान्स असिस्टंट म्हणूनही तिने काम केले. या व्यतिरिक्त ती मॉडलिंगमध्ये करिअर करीत होती. याचदरम्यान तिला २००३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या एका सुपरहिट चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. होय, २००३ मध्ये आलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात डेजीने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. परंतु तिला कोणीही त्यावेळी नोटीस केले नव्हते.