Join us

आधी राम मंदिर, आता तिरंगा... बॉलिवूड 'भाईजान'च्या नव्या स्पेशल एडिशन घड्याळाची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 14:54 IST

सलमान खानच्या लक्झरी घड्याळानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हे घड्याळ केवळ तिरंग्यामुळे नाही तर त्याच्या किंमतीमुळेही चर्चेत आहे.

The World Is Yours Dual Time Zone: Salman Khan: बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान हा सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. फक्त अभिनयच नाही, तर त्याचं स्टाईल स्टेटमेंट नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतं. सलमान खान जे काही घालतो, वापरतो किंवा शेअर करतो, त्याकडे चाहते आणि माध्यमांचं लक्ष वेधलं जातं. सलमानकडे लक्झरी घड्याळांचं मोठं कलेक्शन आहे.  काही महिन्यांपूर्वी सलमान खानने राम मंदिर असलेलं घड्याळही घातलं होतं, तेव्हाही त्याच्या घड्याळाची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा सलमान एका खास घड्याळामुळे चर्चेत आला आहे. हे घड्याळ काय आहे? त्याची खासियत काय? आपण जाणून घेऊ

सलमान खान आणि जेकब अँड कंपनीचे संस्थापक जेकब अराबो यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता सलमान याने जेकब अँड कंपनीच्या सहकार्याने "द वर्ल्ड इज़ योर्स ड्यूल टाइम झोन" हे एडिशन लाँच केलं आहे. सलमाननं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. ज्यामध्ये हे घड्याळ दिसून येत आहे. जगाच्या नकाशाव्यतिरिक्त, या घड्याळात भारतीय तिरंग्याची झलक दिसतेय. तसेच सलमानच्या नावाचे आद्याक्षरे देखील आहेत. या घड्याळाच्या किंमतीबद्दल बोललो तर ते Ethoswatches.com वर  ३६ लाख ६० हजारमध्ये विकले जात आहे. सलमानने हे एडिशन त्याचे वडील सलीम खान यांना समर्पित केलं आहे. 

"द वर्ल्ड इज़ योर्स ड्यूल टाइम झोन" ही जेकब अँड कंपनीची एक खास घड्याळ आहे. ही घड्याळ दोन वेगवेगळ्या वेळा दाखवतं. त्यामुळे सतत प्रवास करणाऱ्या किंवा जगभरातील आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरतं. 

जेकब अँड कंपनीने त्यांच्या इंस्टाग्रामवर सलमान खानच्या घड्याळाबद्दल एक अपडेट देखील शेअर केलं आहे. त्यांनी लिहलं की, "हे घड्याळ तयार करण्यासाठी सलमान खानसोबत सहयोग करणे म्हणजे उद्देशाच्या ठिकाणाहून डिझाइनकडे जाणं. हे घड्याळ त्यांच्या वडिलांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि कलाकार, आयकॉन आणि जागतिक उपस्थिती म्हणून त्याच्या स्वतःच्या प्रवासासाठी त्याच्या समर्पणाचे प्रतीक आहे. घड्याळाची रचना भारताच्या समृद्ध वारशाला आदरांजली देत.

 

टॅग्स :सलमान खानराम मंदिरराष्ट्रध्वज