Join us
Daily Top 2Weekly Top 5

 भाईजानची सटकली! प्रियांका चोप्राच्या आईला पाहताच फिरवलं तोंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 21:57 IST

प्रियांका चोप्राने ‘भारत’ सोडला अन् ‘दबंग खान’ भडकला. होय, सलमान प्रियांकावर अजिबात नाराज नाही, असे कितीही सांगितले जात असले तरी भाईजानची सटकलीय.

प्रियांका चोप्राने ‘भारत’ सोडला अन् ‘दबंग खान’ भडकला. होय, सलमान प्रियांकावर अजिबात नाराज नाही, असे कितीही सांगितले जात असले तरी भाईजानची सटकलीय. शेवटी ऐनवेळी प्रियांकाने चित्रपट सोडावा, म्हणजे काय? हाच भाईजानचा सवाल आहे. कालपरवानच सलीम खान यांनी सलमान प्रियांकावर अजिबात नाराज नसल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात सलमान प्रियांकाच्या या कारनाम्यामुळे संतापलेला दिसतोय. काल मुंबईत सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राचा फॅशन शो आयोजित केला गेला. या फॅशन शोला जान्हवी कपूर,ईशान खट्टर, सारा अली खान, युलिया वंतूर, मौनी रॉय, अथिया शेट्टी असे अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले. सलमान खान व कॅटरिना कैफ या शोचे शो स्टॉपर होते. 

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, शो सुरू होण्यापूर्वी मनीष मल्होत्रा सलमान व कॅटरिनाशी चर्चा करत असताना, तिथे प्रियांकाची आई मधू चोप्रा मनीषला भेटायला आल्या. मधू 9.30 वाजताच शोच्या ठिकाणी पोहोचली होत्य. आल्याबरोबर त्या मनीषला भेटायला बॅक स्टेजला पोहोचल्या. याठिकाणी सलमान व कॅटरिना आपल्या कॅटवॉकची तयारी करत होते. पण मधू यांना पाहून सलमानने म्हणे, तोंड फिरवले. केवळ सलमाननेचं नाही तर कॅटरिनानेही मधू यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.मधू या इव्हेंटमधून बाहेर आल्यावर एका पत्रकारांनी त्यांना घेरले. प्रियांकाने ‘भारत’ सोडल्यामुळे सलमान तिच्यावर नाराज आहे, हे खरे आहे का? असा सवाल पत्रकारांनी मधू यांना केला, यावर, तो प्रियांकावर नाराज आहे की नाही, हे मी कसे सांगू, तुम्ही त्यालाच विचारा, असे मधू म्हणाल्या, एकंदर काय तर मधू यांनी यावर बोलणे टाळले. पण ज्याप्रकारे सलमानने त्यांना टाळले, त्यावरून तरी त्यांना कळायचे ते कळले.

टॅग्स :सलमान खान