Join us
Daily Top 2Weekly Top 5

यांना ओळखलंत का? हे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते असून यांचा मुलगा आज सुपरस्टार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 12:26 IST

एका बॉलिवूडच्या अभिनेत्याचा तरुणपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा फोटो अनेकांनी लाईक केला असून अनेकांनी या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील सगळ्याच प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये एक आहे. दबंग खान हीच त्याची आज ओळख आहे. या दबंग खानने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सलमान खान नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या संपर्कात असतो. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोला आठ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे तर अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान खानने त्याचा स्वतःचा नव्हे तर त्याच्या वडिलांचा म्हणजचे सलीम खान यांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबतच माय डॅडी हँडसमोस्ट असे लिहिले आहे. यावर सलीम खान खरंच त्यांच्या तरुणपणात दिसायला खरंच अतिशय सुंदर होते असे नेटिझन्सने देखील म्हटले आहे.

सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सलीम खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. सलीम खान यांनी एक अभिनेता म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी भारत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी दिवाना, तिसरी मंजिल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण एक अभिनेता म्हणून त्यांना त्यांची ओळख मिळवता आली नाही. सलीम खान हे मुळचे इंदौरचे असून ते केवळ कामासाठी मुंबईत आले होते. चित्रपटात अपयश मिळाल्यानंतर पुन्हा इंदौरला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी चित्रपटांचे लेखन करायला सुरुवात केली. त्यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर त्यांच्या आणि जावेद अख्तर यांच्या जोडीने मिळून सीता और गीता, डॉन, शोले यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखकांमध्ये आज त्यांची गणना केली जाते. 

सलीम खान यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज त्यांची मुले अरबाज खान, सोहेल खान आणि सलमान खान बॉलिवूडमध्ये करियर करत आहेत. 

टॅग्स :सलीम खानसलमान खान