Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जेव्हा कुणालाच तुमच्यासोबत राहायचं नसतं..." शर्टलेस फोटो शेअर करत सलमान खान एकाकीपणावर व्यक्त झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 14:53 IST

नुकतीच सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय.

बॉलिवूडचा 'सुलतान' म्हणजेच अभिनेता सलमान खान आणि त्याचा शर्टलेस लूक हे समीकरण बॉलिवूडमध्ये गेल्या तीन दशकांपासून सुपरहीट ठरलं आहे. पडद्यावर भाईजानने शर्ट काढला की थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडणार हे अगदी ठरलेलं असतं.सलमानचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर आला की काही मिनिटांत व्हायरल होतो. आताही सलमाननं आपला शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये सलमान खान सिक्स पॅक अ‍ॅब्स फ्लॉन्ट करतोय. हा फोटो पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाला आहे. पण यासोबतच या फोटोला सलमान खाननं दिलेल्या कॅप्शननं चाहत्यांना विचार करायला भाग पाडलं आहे.

सलमान खानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहमीप्रमाणे सलमानची पिळदार शरीरयष्टी आणि ६-पॅक ॲब्स पाहून चाहत्यांच्या नजरा खिळल्या. फोटोमध्ये सलमान गंभीर विचारात गढलेला दिसत आहे. या फोटोसोबत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मी, माझं आणि स्वतःचं आयुष्य… स्वतःसोबत राहण्याचे दोन मार्ग असतात एक म्हणजे एकटं राहणं, जे आपण स्वतःच्या इच्छेने निवडतो आणि दुसरं म्हणजे एकाकीपणा, जेव्हा कुणालाच तुमच्यासोबत राहायचं नसतं. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्हीच ठरवा".  काही तासांतच या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले आहे.


सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'मातृभूमी' या बहुप्रतिक्षित चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, प्रसिद्ध निर्माता दिल राजू यांच्या एका आगामी चित्रपटात तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीची 'लेडी सुपरस्टार' नयनतारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan's shirtless photo sparks talk about loneliness and life.

Web Summary : Salman Khan's shirtless photo flaunting his physique went viral. His caption about loneliness and choosing to live alone sparked contemplation among fans. He will be seen in 'Matrubhoomi' and with Nayanthara in Dil Raju's film.
टॅग्स :सलमान खान