Join us

सलमान खानने गुपचुप सुरु केलं आपल्या नव्या सिनेमाचं शूटिंग, महेश मांजरेकर करतायेत दिग्दर्शन...

By गीतांजली | Updated: December 9, 2020 13:20 IST

अभिनेता शाहरुख खान आणि रणवीर सिंगच्या मार्गावर दबंग अभिनेता सलमान खानही चालताना दिसतोय.

अभिनेता शाहरुख खान आणि रणवीर सिंगच्या मार्गावर दबंग अभिनेता सलमान खानही चालताना दिसतोय. त्यानेही आपला आगामी सिनेमा 'अंतिम'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे पण कोणाला कानोकान याची खबर लागू दिली नाही. सलमान खानने रविवारपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान या सिनेमात शीख पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सलमान खानचे विश्वस्त दिग्दर्शक महेश मांजरेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. सलमान आधी यात कॅमिओ करणार होता, पण पटकथा बदलल्यानंतर आता या सिनेमात तो एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यातच पुण्यात 'अंतिम' सिनेमाचे शूटिंग सुरू झाले. महेश मांजरेकर यांनी आयुष शर्माच्या दृश्यांसह सिनेमाची सुरूवात केली आणि 20 दिवसांच्या शेड्यूलनंतर सलमान खानदेखील मुंबई फिल्म सिटीमध्ये शूटिंगला सुरुवात केली. सिनेमात सलमान एका शीख पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारणार आहे, जो माफिया राज संपवायला आणि गँगवार संपवण्यासाठा काम करतो.  'अंंतिमध्ये' सलमान पूर्णपणे एका वेगळा लूकमध्ये दिसणार आहे.

सलमानने शीख पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी दाढी वाढवली केली आहे आणि तो पहिल्यांदाच शीख पोलिसांची भूमिका साकारत आहे. आपला नवा लूक कुठूनही लीक होऊ नये यासाठी त्याने पूर्णपणे बंदोबस्त केला आहे.या सिनेमात आयुष एका गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. सिनेमात सलमान आणि आयुष व्यतिरिक्त निकितिन धीर मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :सलमान खानमहेश मांजरेकर