Join us

सलमान खान बनला दिल्ली क्रिकेट संघाचा मालक, म्हणाला - "एका नवीन प्रवासासाठी उत्सुक..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:03 IST

शाहरुख, प्रिती झिंटानंतर आता सलमान पहिल्यांदाच क्रिकेट संघाचा मालक झाला आहे. सलमान खानने दिल्ली क्रिकेट संघाची टीम खरेदी केल्याने सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय

सलमान खान हा बॉलिवूडचा दबंग अभिनेता म्हणून ओळखला जातो. सलमानने बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केलंय. सलमानच्या करिअरची गाडी सध्या मात्र रुळावर येत नाहीये. भाईजानचे सध्या रिलीज झालेले सर्व सिनेमे फ्लॉप होत आहेत. अशातच सलमानने एक मोठी अपडेट सर्वांसोबत शेअर केली आहे. सलमानने दिल्ली क्रिकेट संघाची टीम खरेदी केली आहे. ही टीम IPL ची नसून ती ISPL ची आहे. देशातील पहिली टेनिस-बॉल क्रिकेट लीग असलेली इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) पार पडणार आहे. या लीगमधील दिल्ली संघाची टीम सलमानने खरेदी केली आहे.

सलमानने खरेदी केली दिल्लीची टीम

सलमानने त्याच्या सोशल मीडियावर ISPL मधील दिल्ली संघाची टीम खरेदी केल्याची घोषणा केली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तो लिहितो, "दिल्लीच्या मालकाचं स्वागत नाही करणार का? इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सोबत (ISPL) क्रिकेटचा नवीन प्रवास सुरु करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे." अशाप्रकारे सलमानने त्याच्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या. 

सलमानशिवाय या बॉलिवूड कलाकारांनी खरेदी केल्या ISPL टीम

सलमान खानने ISPL मध्ये नवी दिल्लीची टीम खरेदी केल्याने हा संघ आता मजबूत बनला आहे , यात शंका नाही. याशिवाय सलमान खानच्या सहभागाने संपूर्ण लीगमध्ये एक उत्साह आणि नवी ओळख निर्माण होईल. सलमानशिवाय ISPL मध्ये  सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची (टाइगर्स ऑफ कोलकाता), हृतिक रोशनची (बैंगलोर स्ट्राइकर्स), अमिताभ बच्चन यांची (माझी मुंबई), साउथ सुपरस्टार सूर्याची (चेन्नई सिंहम्स), अक्षय कुमारची (श्रीनगर के वीर), राम चरणची (फाल्कन राइजर्स हैदराबाद) अशा टीम सहभागी आहेत. IPL ला जसा देशभरातून प्रतिसाद मिळाला तसा प्रतिसाद ISPL ला मिळेल का, याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :सलमान खानदिल्लीनवी दिल्लीबॉलिवूड