दोन आठवड्यांपूर्वी ‘बिग बॉस’ घरात आणि घराबाहेर घमासान माजले होते. कारण होते जुबैर खान. वीकेंड एपिसोडला सलमानने जुबैरला जाम फैलावर घेतले होते. इतके की, जुबैरला ह्यतेरी औकात क्या? असे नॅशनल टीव्हीवर सलमान बोलून गेला होता. ‘ जब तुम यहां आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसे ही नहीं थी. तुझे कुत्ता न बना दिया तो मेरा नाम सलमान नहीं,’ असे काय काय सलमान झुबैरला बोलला होता. सलमानकडून नॅशनल टीव्हीवर झालेला हा अपमान जुबैरच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता आणि त्याच रात्री ‘बिग बॉस’च्या घरात झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर जुबैरने सलमानविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. इतकेच नाही तर उपचारानंतर दवाखान्यातून निघाल्यानंतर मीडियासमोर हिंमत असेल तर बॉडीगार्डशिवाय समोर ये, अशा शब्दांत सलमानला जाहिर धमकीही दिली होती. जुबैरच्या याच धमकीला सलमानने अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. आता सलमानच्या या उत्तरावर जुबैर कसा रिअॅक्ट होतो, ते बघूच!
ALSO READ: Bigg Boss 11: घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही; कुठे भेटू ते सांग! जुबैर खानने सलमान खानला दिली धमकी!!