Join us

​शिल्पाने उडवली सलमानच्या लग्नाची खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 13:23 IST

तसे पाहिले तर शिल्पा शेट्टी वादापासून दोन हात लांब राहते. मात्र, अनावधानाने (किंवा जाणूनबुजून?) असे काही शब्द बोलले जातात ...

तसे पाहिले तर शिल्पा शेट्टी वादापासून दोन हात लांब राहते. मात्र, अनावधानाने (किंवा जाणूनबुजून?) असे काही शब्द बोलले जातात की नंतर त्याचा पश्चताप होईपर्यंत खूप उशिर झालेला असतो. अशीच काहीशी गत शिल्पाची झाली आहे.मुंबई विमानतळावर जेव्हा ती विद्या बालनसोबत मीडियाशी हितगुज करत होती तेव्हा तिला तारीख सांगितल्यावर मात्र ती जे काही बोलली त्याने उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सलमान-युलियाच्या लग्नाविषयी विचारले असता सुरुवातीला तिने न कळल्यासारखे केले. मात्र, लग्नाची तारीख सांगितल्यावर मात्र ती जे काही बोलली त्याने उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.१८ नोव्हेंबर रोजी सलमान त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंटूरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे, असे सांगितल्यावर ती म्हणाली की, ‘कौन से साल में ये भी पुछ लेना’.आता सल्लुमियांच्या लग्नाचा विषय तसा दीड-दोन दशकांपासून चालू आहे; पण म्हणून काय शिल्पाने त्याची अशी खिल्ली उडवावी? आता ती जरी विनोदाने असे म्हणाली असली तरी सलमान आणि त्याचे चाहते याचा कसा अर्थ घेतात हे काही दिवसांत कळेलच.