Join us

‘लंगोट’ मध्ये सल्लूमियाँ दिसतो जास्त हॉट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 10:27 IST

 सुपरस्टार सलमान खान आणि आमीर खान यांच्यात शीतयुद्ध हे नेहमीच सुरू असते. मात्र, दोघेही ‘सुल्तान’ आणि ‘दंगल’ मुळे भलतेच ...

 सुपरस्टार सलमान खान आणि आमीर खान यांच्यात शीतयुद्ध हे नेहमीच सुरू असते. मात्र, दोघेही ‘सुल्तान’ आणि ‘दंगल’ मुळे भलतेच चर्चेत आहेत. अगोदर तर दोघांचेही हे चित्रपट ‘ईद’ च्या दिवशी रिलीज होणार होते.आमीरने बॉक्स आॅफीसवर सलमानच्या ‘सुल्तान’ सोबत संघर्ष नको म्हणून तारीख पुढे ढकलली. पण, आमीरही सलमानच्या ‘सुल्तान’ मधील परिश्रमाचे कौतुक करतोय. त्याच्याविषयी बोलताना आमीर म्हणाला,‘ मी त्याच्याप्रमाणे ‘दंगल’ मध्ये करायला पाहिले पण मला जमले नाही. माझी बॉडी पूर्णपणे त्याच्यासारखीच आहे. त्याने परिश्रमाने बॉडी बनवली आहे.सलमान हा खरंतर हॅण्डसम अभिनेता आहे. तो त्याच्या कपड्यांशिवाय जास्त हॅण्डसम दिसतो. तो चित्रपटात घातलेल्या लंगोट मध्ये सर्वांत जास्त हॉट दिसतो. तो जन्मत:च चांगला आणि चार्मिंग व्यक्ती आहे.