Salim Khan Discharge Update : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. मेंदूतील रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास त्यांना आज ( २३ फेब्रुवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे.
१७ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता सलीम खान यांना आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांच्या विशेष पथकाने त्यांच्या प्रकृतीचे परीक्षण केले. १८ फेब्रुवारी रोजी रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले की त्यांची डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (DSA) करण्यात आली. ही मेंदूची शस्त्रक्रिया नसून मेंदूतील रक्तवाहिन्यांची स्थिती तपासण्यासाठीची प्रगत निदान चाचणी आहे. प्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कुटुंबीयांनी आरोग्यविषयक माहिती सार्वजनिकरित्या जाहीर न करण्याची विनंती केली. आरोग्य हा वैयक्तिक विषय असून अधिकृत माहिती कुटुंबाकडूनच दिली जावी, अशी भूमिका त्यांनी घेतली.
सेलिब्रिटींची रुग्णालयात भेट
सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक कलाकारांनी रुग्णालयात भेट दिली. २१ फेब्रुवारी रोजी उशिरा शाहरुख खान रुग्णालयात पोहोचला. तसेच रणवीर सिंग, फराह खान, आमिर खान आणि जावेद अख्तर यांनीही सलीम खान यांची भेट घेतली. अभिनेता एजाज खान यांनी २० फेब्रुवारी रोजी भेट देऊन प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. २२ फेब्रुवारी रोजी कुटुंबीयांपैकी सोहेल खान आणि अर्पिता शर्मा रुग्णालयात दिसले होते.
९० वर्षीय सलीम खान यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. त्यांनी १९६० च्या दशकात अभिनयातून कारकीर्द सुरू केली; मात्र पुढे लेखनाकडे वळत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. ७० आणि ८० च्या दशकात त्यांच्या पटकथांना प्रचंड मागणी होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी १९६४ मध्ये सलमा खान (पूर्वाश्रमीच्या सुशीला चरक) यांच्याशी विवाह केला. त्यांना सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलविरा अशी मुले आहेत. १९८१ मध्ये त्यांनी अभिनेत्री हेलेन यांच्याशी विवाह केला. नंतर अर्पिता यांना दत्तक घेण्यात आले.
Web Summary : Writer Salim Khan was admitted to Lilavati Hospital due to a brain hemorrhage. His condition is improving, and discharge is expected soon. Celebrities like Shah Rukh Khan and Aamir Khan visited him. Khan's family requested privacy regarding his health.
Web Summary : लेखक सलीम खान को मस्तिष्क रक्तस्राव के कारण लीलावती अस्पताल में भर्ती कराया गया। उनकी हालत में सुधार हो रहा है, और जल्द ही छुट्टी मिलने की उम्मीद है। शाहरुख खान और आमिर खान जैसे सेलेब्रिटीज ने उनसे मुलाकात की। खान के परिवार ने उनके स्वास्थ्य के बारे में गोपनीयता का अनुरोध किया।