Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलीम खान रुग्णालयात, सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान'चं शूटिंग लोकेशनच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:53 IST

सलीम खान यांच्यावर काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या वैयक्तिक आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. एकीकडे वडील सलीम खान यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे तो चिंतेत असताना, दुसरीकडे आपल्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाची जबाबदारीही तो पार पाडत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या सेटवरील सलमानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वडील अॅडमिट असल्याने सलमानने रुग्णालयाजवळच सिनेमाचं शूट लोकेशन ठेवलं.

शूटिंग लोकेशनमध्ये बदलमीडिया रिपोर्टनुसार, वडील सलीम खान यांची काळजी घेण्यासाठी आणि हॉस्पिटलच्या जवळ राहता यावे, यासाठी 'बॅटल ऑफ गलवान'चे शूटिंग महबूब स्टुडिओमध्ये हलवण्यात आले आहे. वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देता यावे आणि कामातही खंड पडू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी चित्रपटाच्या एका गाण्याचे आणि ॲक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण सुरू आहे.

सेटवर होळी सेलिब्रेशनव्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सलमान खान चित्रपटाच्या क्रू मेंबर्स आणि बालकलाकारांसोबत पोझ देताना दिसत आहे. काही बालकलाकार लष्करी गणवेशात दिसत असून सलमानच्या चेहऱ्यावरही हास्य पाहायला मिळत आहे. याशिवाय, सेटवरील होळी सेलिब्रेशनचेही काही फोटो समोर आले आहेत, ज्यात इतर कलाकार रंगात न्हाऊन निघाले आहेत, तर सलमान कॅज्युअल लूकमध्ये त्यांच्यासोबत सहभागी झाला आहे.

सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल माहितीसलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९० वर्षीय सलीम खान यांना किरकोळ ब्रेन हॅमरेज झाल्याचे समजते. सुरुवातीला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली.

आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या या कठीण काळातही सलमान खान आपले व्यावसायिक कर्तव्य पार पाडत असल्याने चाहत्यांकडून त्याचे कौतुक होत आहे. 'संकटकाळातही सलमान आपले सर्वोत्तम प्रयत्न करत आहे,' अशा प्रतिक्रिया त्याचे चाहते सोशल मीडियावर देत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan shifts 'Battle of Galwan' shoot after Salim Khan hospitalized.

Web Summary : Salman Khan shifted 'Battle of Galwan' shoot to be near his ailing father, Salim Khan, admitted to Lilavati Hospital after a minor brain hemorrhage. Shooting location changed to Mahboob Studio, prioritizing family while continuing professional commitments. Fans praise Salman's dedication during tough times.
टॅग्स :सलमान खानहॉस्पिटलमुंबई