Join us

Saif Ali Khan : १:३७ वाजता एन्ट्री, २:३३ ला एक्झिट... इमारतीच्या पायऱ्या चढताना दिसला सैफचा हल्लेखोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:51 IST

Saif Ali Khan : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या शाहिद नावाच्या व्यक्तीची चौकशी करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या शाहिद नावाच्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. मुंबईतील ताडदेव पोलीस स्टेशनच्या टीमने त्याला गिरगाव येथील फॉकलँड रोड येथून ताब्यात घेतलं आहे.

शाहिदवर आधीच घरफोडीचे चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. याचा अर्थ असा की, या व्यक्तीने यापूर्वीही चोरीसाठी लोकांच्या घरात प्रवेश केला आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा तोच व्यक्ती आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आता नवीन सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. हल्लेखोर व्हिडिओमध्ये इमारतीच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. त्याने आपला चेहरा झाकला होता. १६ जानेवारीच्या रात्री १.३७ वाजताच्या सुमारास हा व्यक्ती सैफच्या इमारतीत पायऱ्या चढताना. यानंतर २.३३ वाजता पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसत आहे. 

१६ जानेवारी रोजी एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला. हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मानेला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती आता सुधारली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

"हाच खरा हिरो! रक्तबंबाळ अवस्थेतही तैमूरचा हात धरुन रुग्णालयात सिंहासारखा आला सैफ"

लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शुक्रवारी सैफ अली खानचे मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा सैफ रुग्णालयात आला तेव्हा तो रक्तबंबाळ झाला होता. पण तरीही तो सिंहासारखा चालत होता. सैफ त्याचा ८ वर्षांचा मुलगा तैमूरला घेऊन रुग्णालयात पोहोचला. स्वतः चालत आला होता. त्याने एका हिरोसारखं काम केलं आहे. तो खऱ्या आयुष्यातील हिरो आहे. त्यांची तब्येत आता ठीक आहे. अभिनेत्याला आयसीयूमधून एका स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सध्या त्याला विश्रांतीची गरज आहे. 

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडमुंबई पोलीसगुन्हेगारी