Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sacred Games 2 : गणेश गायतोंडे येणार, पण त्याआधी हे भन्नाट मीम्स पाहा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 15:55 IST

सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी यांच्या हिट डायलॉगवर एकापेक्षा एक भारी मीम्स सोशल मीडियावर धूम करत आहेत.

ठळक मुद्दे या सीरिजमध्ये सैफने मुंबईचा पोलिस इन्स्पेक्टर सरताज सिंगची भूमिका साकारली आहे तर नवाजुद्दीनने गणेश गायतोंडेची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे.

नेटफ्लिक्सवरची भारताची पहिली ओरिजनल क्राईम वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर आज  ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर रिलीज झाला. सोबत सोबत या वेबसीरिजची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली. येत्या 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होणार आहे. साहजिकच, चाहते क्रेजी झाले आहेत. तूर्तास ‘सेक्रेड गेम्स 2’च्या ट्रेलरवरचे भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी यांच्या हिट डायलॉगवर एकापेक्षा एक भारी मीम्स सोशल मीडियावर धूम करत आहेत.‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये कल्कि कोच्लिन, रणवीर शौरी असे अनेक नवे चेहरे आहेत. या सीरिजमध्ये सैफने मुंबईचा पोलिस इन्स्पेक्टर सरताज सिंगची भूमिका साकारली आहे तर नवाजुद्दीनने गणेश गायतोंडेची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. पंकज त्रिपाठी गुरजीच्या भूमिकेत आहेत. ‘सेक्रेड गेम्स’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. ही वेबसीरिज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत आहे.

 

पंकज त्रिपाठी यांना गुरुजीच्या अवतारात बघून फॅन्स क्रेजी झालेले दिसत आहेत. ‘बलिदान देना पडेगा’ हा त्यांच्या तोंडचा डायलॉग वा-याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर येताच, ‘वेबसीरिज का बाप आ गया,’असे एका युजरने लिहिले आहे.

 

‘लाईफ हराम हो गई थी’ या डायलॉगवरही मीम्स तयार करण्यात आले आहेत.

 हे भन्नाट मीम्स पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. 

  

टॅग्स :सॅक्रेड गेम्सनवाझुद्दीन सिद्दीकीपंकज त्रिपाठीसैफ अली खान नेटफ्लिक्स