Join us
Daily Top 2Weekly Top 5

अचानक चर्चेत आली सचिनची लेक सारा तेंडुलकर! इंटरनेटवर करतेय धूम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 07:53 IST

बॉलिवूड स्टार किड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, तैमूर यांच्या रांगेत आता आणखी एका स्टारकिडची एन्ट्री झाली आहे. तिचे नाव आहे, सारा तेंडुलकर.

बॉलिवूड स्टार किड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, तैमूर यांच्या रांगेत आता आणखी एका स्टारकिडची एन्ट्री झाली आहे. तिचे नाव आहे, सारा तेंडुलकर. होय, सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर. सध्या साराच्या फोटोंनी इंटरनेटवर धूम केली आहे.

काही दिवसांपूर्वी आकाश अंबानीच्या एंगेजमेंट पार्टीत सारा दिसली होती. या पार्टीतील तिच्या लूकची बरीच चर्चा झाली होती. आता मात्र साराच्या इंटरनेटवरील ताज्या फोटोंची चर्चा होतेय.

 २० वर्षांची सारा सध्या शिकतेय. पण गेल्या वर्षभरापासून तिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चाही रंगतेय. अनेक चाहते, तिच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत. 

सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये दिसू लागलेला हा गोड व सुंदर चेहरा बॉलिवूड चित्रपटांत कधी दिसेल, या प्रतीक्षेत चाहते आहेत.

सारा बॉलिवूडमध्ये येणार वा नाही, याबद्दल तूर्तास सांगता येणार नाही. पण आलीच तर अनेक नव्या दमाच्या अभिनेत्रींची ती सुट्टी करणार, हे मात्र पक्के सांगता येईल. तिचे ताजे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही याचा अंदाज येईल.

तुम्हाला ठाऊक नसेल पण क्रिकेटचा ‘देव’ सचिन त्याच्या जीवनात साराला त्याची प्रेरणा मानतो. यामागचे कारण म्हणजे, अगदी अल्लड वयात साराने वडिलांना चांगले काम करण्यासाठी दिलेली प्रेरणा.

स्वत:पेक्षा दुसऱ्याबद्दल विचार करणा-या सारानेच सचिनला चॅरेटीमध्ये दान करण्याचे सांगितले. खुद्द सचिनने एका मुलाखतीत हे सांगितले होते. सचिन कोणत्याही कार्यक्रमात त्याच्या मुलीचे कौतुक करायला विसरत नाही. तो साराला स्वत:ची प्रेरणा सांगतो.

टॅग्स :सारा तेंडुलकर