Join us

अनुष्का शर्माच्या चुलत बहिणीला पाहिलंय का? इंटिमेट सीनमुळे चर्चेत आली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 13:32 IST

अनुष्का शर्माच्या चुलत बहिणीची चर्चा

अभिनेत्री अनुष्का शर्माची (Anushka Sharma) चुलत बहीण रुहानी शर्मा (Ruhani Sharma) सध्या चर्चेत आहे. 'आगरा' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमातील इंटिमेट सीनमुळे ती चर्चेत आली. हा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रुहानीने साऊथ इंडस्ट्रीतून अभिनयाला सुरुवात केली होती. आता ती बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावत आहे. रुहानी शर्माविषयी आणखी जाणून घ्या.

रुहानी शर्माचा जन्म १८ सप्टेंबर १९९४ रोजी हिमाचल प्रदेशमध्ये झाला. चंदीगढमध्येच तिने आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. रुहानीने तेलुगु सिनेमा 'chi la sow' मधून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर ती काही मल्याळम आणि तेलुगु सिनेमांमध्ये दिसली. यातील अभिनयामुळे तिचं कौतुक झालं. नुकताच रुहानीचा 'आगरा' सिनेमा रिलीज झाला. यातील इंटिमेट सीन्सची खूप चर्चा आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या सिनेमाचा प्रीमिअर झाला. यामध्येही रुहानीचं कौतुक झालं. 

रुहानी शर्मा तिच्या बोल्डनेसमुळेही लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. रुहानी बोल्डनेसमध्ये अनुष्कालाही मागे टाकते. २०१९ साली 'पॉइजन' वेबसीरिज आणि 'ब्लॅकआऊट' सिनेमात ती झळकली. तिने जास्त तेलुगु सिनेमात काम केलं आहे. रुहानी यावर्षी रिलीज झालेल्या 'सैंधव' या तेलुगु सिनेमातही दिसली. यामध्ये ती सुपरस्टार दग्गुबती व्यंकटेश यांच्यासोबत झळकली. पण तिला याचा फारसा फायदा झाला नाही. 

टॅग्स :अनुष्का शर्माबॉलिवूडपरिवार