Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोमँटिक फोटो शेअर करत निकने प्रियांकाला म्हटले भावी मिसेस जोनास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 20:00 IST

प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो.लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते.

ठळक मुद्देआज प्रियांकाने निकसोबत रोका केला आहेऑक्टोबरमध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे

प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो.लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांची होणा-या नवरीच्या मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता प्रियांकाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रियांकाचा होणारा भावी नवरा निक जोनासने प्रियांका सोबतचा रोमाँटिक अंदाजातला फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिचा उल्लेख भावी मिसेस जोनास असा केला आहे. या फोटोसोबत त्यांने कॅप्शनदेखील दिले आहे. 

 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका आणि निकच्या अफेअरच्या बातम्या येत होत्या. मात्र प्रियांकाने यावर मौन बळगणेच पसंत केले होते. मात्र ज्यावेळी प्रियांकाने सलमानच्या 'भारत' सिनेमातून एक्झिट घेतली त्यावेळा मात्र यावर शिकामोर्तब झाला. आज प्रियांकाने निकसोबत रोका केला आहे. ऑक्टोबरमध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती आहे. 

 काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण प्रियंकाने ही बाब अनेकांपासून लपवली. मात्र आता प्रियांकाला तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते आहे. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियांका रिंग दिसते आहे.  सोशल मीडियावर हा फोटो येताच वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या फोटोत प्रियांकाने डायमंड रिंग घातल्याचे दिसत आहे. या रिंगवरुनच तिचा साखरपुडा झाल्याचं पक्क मानलं जात आहे. अशातच आता या रिंगच्या किंमतीची चर्चा होऊ लागली आहे.  harpersbazaar.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने घातलेल्या रिंगची किंमत तब्बल २०० हजार डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय किंमत १.५ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासलमान खान