Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शेट्टीचं प्रेक्षकांना खास सरप्राईज, आयकॉनिक सीन केला रिक्रिएट; हसून हसून लोटपोट व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 10:16 IST

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याने आपल्या चाहत्यांना मोठी खूशखबर दिली आहे.

Rohit Shetty Golmaal 5 : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीची सुपरहिट फ्रँचायझी 'गोलमाल'च्या पुढच्या भागाची सर्वांनाच उत्सुकता आहे. आतापर्यंत 'गोलमाल'चे चार भाग आले. चारही सिनेमांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता रोहित शेट्टी 'गोलमाल ५' एका नव्या अंदाजात घेऊन येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 'गोलमाल ५'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता रोहितं आपल्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल. 

रोहित शेट्टीने २००६ साली प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'गोलमाल : फन अनलिमिटेड'मधील आयकॉनिक कार रेसिंगचा सीन पुन्हा रिक्रिएट केलाय. यामध्ये २००६ मधील मूळ 'गोलमाल' चित्रपटातील कार रेसिंगचा जुना सीन आणि 'गोलमाल ५'नवा सीन एकत्र दाखवण्यात आला आहे. अर्शद वारसी (माधव) गाडी चालवत असून शर्मन जोशी (लक्ष्मण) हा स्त्रीच्या वेशात त्याच्या शेजारी बसलेला दिसतोय. तोच जुना आयकॉनिक लूक पाहून चाहत्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 

रोहितने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, "तुम्ही पहिला 'गोलमाल' पाहिला, तेव्हा तुमचे वय किती होते? मी तुम्हाला वचन देतो की, ते आनंदाचे दिवस तुम्ही लवकरच पुन्हा अनुभवू शकाल... शुटिंग सुरू आहे". या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. दरम्यान,  'गोलमाल ५' पुन्हा एकदा अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर आणि शर्मन जोशी पाहायला मिळणार आहेत. शिवाय, या भागात अक्षय कुमारची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अक्षय कुमार नायकाच्या नाही, तर एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.


English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Shetty surprises fans, recreates iconic Golmaal scene!

Web Summary : Rohit Shetty is bringing 'Golmaal 5' with a recreated iconic car racing scene from the first film. Arshad Warsi and Sharman Joshi reprise their roles. Akshay Kumar will be seen as a villain. Shooting is underway.
टॅग्स :रोहित शेट्टी