रोहितचे मानाल तर,‘दिलवाले’ फ्लॉप झाला, त्यामागे त्याची स्क्रिप्ट कारणीभूत होती. या चित्रपटाची ओरिजनल स्क्रिप्ट वेगळीच होती. पण ऐनवेळी रोहितने त्यात बदल केले अन् सगळेच फिस्कटले.रोहितने सांगितले की, ‘दिलवाले’ची ओरिजनल स्क्रिप्ट ही तीन भावांची कथा होती. ही ओरिजनल स्क्रिप्ट कॅरी केली असती तर त्यात कालोज फ्लॅशबॅकमध्ये केवळ तीन चार सीन्समध्ये दिसली असती. पण या चित्रपटातून काजोल व शाहरूख या जोडीचे कमबॅक होणार होते. लोक त्यामुळे एक्ससाईटेड दिसले. याच एक्ससाईटमेंटमध्ये मी सुद्धा ओरिजनल स्क्रिप्ट बाद करून काजोल व शाहरूखच्या रोमान्सवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या हातून एक मोठ्ठी चूक झाली. चित्रपट दणकून आपटला. मी पहिल्यांदाच ओरिजनल स्क्रिप्ट बदलली होती. पण यातून मी एक मोठ्ठा धडा शिकलो. यापुढे कधीही ओरिजनल स्क्रिप्टशी छेडछाड करणार नाही, हे मी ठरवून टाकले.
ALSO READ : रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग या महिन्यात सुरु करणार चित्रपटाचे शूटिंग
‘दिलवाले’ची ही ओरिजनल स्क्रिप्ट अजूनही माझ्या डोक्यात आहे. कदाचित १५ वर्षांनंतर मी यावर चित्रपट काढेल. कारण आत्ताच मी तो आणला तर सोशल मीडियावर हा चित्रपट एक मोठा विनोद बनून राहिल. ‘दिलवाले’ची ओरिजनल स्क्रिप्ट अगदी ‘रोहित शेट्टी स्टाईल’ आहे, असेही त्याने सांगितले.