Join us  

नेहा कक्करच्या नवऱ्यावर दादा कोंडकेंची क्रेझ; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायलं 'ढगाला लागली कळं' गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 1:09 PM

Rohanpreet singh: रोहनप्रीतने त्याच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आजवर दादा कोंडकेची अनेक गाणी अजरामर झाली आहेत. त्यातलंच एक गाणं म्हणजे ढगाला लागली कळं. आजही या गाण्याची लोकप्रियता तितकीच आहे. विशेष म्हणजे या गाण्याची क्रेझ प्रसिद्ध गायक आणि नेहा कक्करचा नवरा रोहनप्रीत सिंगवर असल्याचं पाहायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्याने चक्क लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ढगाला लागली कळं हे गाणं गायलं. 

रोहनप्रीतने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो बदलापूरला एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर त्यालाही मराठी गाण्याची भूरळ पडली असून त्याने दादा कोंडकेंचं सुपरहिट ठरलेलं गाणं गायलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रोहनप्रीतने श्रोत्यांमध्ये जाऊन ढगाला लागली कळं हे गाणं गायलं. विशेष म्हणजे त्याला मराठी गाणं म्हणताना पाहून चाहतेदेखील प्रचंड खूश झाले. त्यामुळे त्यांनीही रोहनप्रीतला साथ दिली.

रोहनप्रीतचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी कक्कर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मी स्वतः या क्षणाची साक्षीदार आहे. तुझी पत्नी असल्याचा मला खूप अभिमान आहे,” असं नेहाने कमेंट करत म्हटलं आहे.  तर,  “आताचा स्टार मराठी मुलगा,”असं टोनी कक्करने म्हटलं आहे. दरम्यान, बदलापूरमध्ये झालेल्या या कॉन्सर्टमध्ये त्याच्यासोबत नेहा कक्कर आणि सोनू निगम यांनी सुद्धा हजेरी लावली होती.

टॅग्स :बॉलिवूडदादा कोंडकेनेहा कक्करसेलिब्रिटीबदलापूर