Join us

रिया चक्रवर्तीचा 'हा' फोटो सोशल मीडियावर होतोय खूप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 13:45 IST

रिया चक्रवर्तीच्या सोशल मीडियावरील या फोटोची होतेय चर्चा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली होती. हळूहळू रिया पुर्ववत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच रियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या दिवसाची सुरुवात कशी होते? याची एक झलक दाखवली आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत तिच्या हातात हनुमान चालीसा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात हनुमान चालीसाचे वाचन करताना दिसते आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने आर्यन खानच्या अटकेनंतर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने म्हटले होते की, तुम्ही ज्या परिस्थितीमधून जात आहात त्यामधून शिकून पुढे मार्गक्रमण करत राहा. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे निधन होऊन एक वर्ष उलटले आहे. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन चर्चेत आले होते. त्यानंतर बऱ्याच कलाकारांची चौकशी करण्यात आली. ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नावही समोर आले होते. त्यासाठी तिला तुरूंगातही जावे लागले होते.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत