Join us

रिया चक्रवर्तीने बऱ्याच महिन्यानंतर सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, लिहिला हा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 13:50 IST

आता बऱ्याच महिन्यानंतर रियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत असते. मागील वर्षी रिया चक्रवर्तीला सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनमध्ये तुरूंगाची हवा खावी लागली होती. मात्र हळूहळू तिचे जीवन पूर्ववत होताना दिसत आहे. आता बऱ्याच महिन्यानंतर रियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चर्चा होताना दिसते आहे. 

रिया चक्रवर्ती हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिया आणि तिची आई संध्या चक्रवर्तीचा हात दिसतो आहे. फोटो शेअर करत रियाने लिहिले की, तुम्हाला सर्वांना हॅप्पी वुमन्स डे. आई आणि मी नेहमी एकत्र. माझी ताकद, माझे धैर्य, माझी आई.

महिला दिनानिमित्त रियाने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. ऑक्टोबरमध्ये रियाला जामीन मिळाला. त्यानंतर रिया आपले जीवन पुन्हा पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात आहे. 

दरम्यान ‘चेहरे’ची घोषणा झाली त्यावेळी या सिनेमाच्या लीड कास्टमध्ये अमिताभ, इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्तीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. रिया चक्रवर्तीने अगदी या सिनेमातील तिचा फर्स्ट लूकही शेअर केला होेता. पण पोस्टरमध्ये रिया कुठेही नाही. इमरान हाश्मीने शेअर केलेल्या ‘चेहरे’च्या पोस्टमध्ये सिनेमातील कलाकारांची नाव टॅग करण्यात आली आहेत. पण यात रियाचे नाव मिसींग आहे. रियाच्या चाहत्यांनी लगेच ही गोष्ट नोटीस केली. सोशल मीडियावर लगेच यावरच्या प्रतिक्रिया उमटल्या.

मागील वर्षी सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाकडून रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच तिच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. मात्र तिला ड्रग्स प्रकरणात तिला एक महिना तुरूंगात रहावे लागले होते.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत