Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रितुपर्णा सेनच्या स्वप्नात यायचा तो ‘रेप सीन’! अनेक रात्री काढल्या जागून!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 14:47 IST

बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रीय अभिनेत्री आणि निर्माती रितुपर्णा सेनगुप्ता हिचा आज (७ नोव्हेंबर) वाढदिवस. ७ नोव्हेंबर १९७१ रोजी तिचा जन्म ...

बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रीय अभिनेत्री आणि निर्माती रितुपर्णा सेनगुप्ता हिचा आज (७ नोव्हेंबर) वाढदिवस. ७ नोव्हेंबर १९७१ रोजी तिचा जन्म झाला. जाणून घेऊ यात, रितुपर्णाच्या आयुष्याबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी...



रितुपर्णाला लहानपणापासून कलेत रूची होती. नृत्य, संगीत, चित्रकलेत ती निष्णांत आहे. ‘शेत पाथोर एर थाला’ हा रितुपर्णाचा पहिला चित्रपट. चित्रपटांतील बोल्ड अंदाजामुळे रितुपर्णा चर्चेत आली. ‘दहन’ या चित्रपटात तिने अतिशय बोल्ड भूमिका साकारली. या चित्रपटासाठी १९९८ मध्ये तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविले गेले होते.



‘मित्तल वर्सेस मित्तल’ या चित्रपटातील रितुपर्णावर चित्रीत करण्यात आलेल्या एका सीनने तिचा अनेक वर्षे पिच्छा पुरवला.  हा एक रेप सीन होता. हा सीन रितुपर्णाने पडद्यावर असा काही जिवंत केला की, तिच्या मेंदूवर त्याचा परिणाम झाला होता. अनेक वर्षे रितुपर्णा या सीनमुळे झोपेतून दचकून उठायची. या सीनमुळे रितुपर्णाने अनेक रात्री जागून काढल्या. या सीलमध्ये रितुपर्णासोबत अभिनेता रोहित राय होता. एका मुलाखतीत रितुपर्णा यावर बोलली होती. ‘तो रेप सीन अनेक दिवस माझ्या स्वप्नात येत राहिला. मी रात्रभर झोपू शकले नव्हते. तो सीन आठवला की, अंगावर काटा यायचा. रेप सीन शूट झाला, त्या दिवसाची रात्र तर माझ्यासाठी भयानक होती. दिग्दर्शकाला हे कळल्यानंतर त्यांनी पुढील सगळे सीन्स टोन डाऊन केले होते. जेणेकरून मला त्रास होऊ नये,’ असे तिने सांगितले होते.



‘तिसरा कौन’हा रितुपर्णाचा पहिला बॉलिवूडपट होता. यानंतर ‘मैं, मेरी पत्नी और वो’ या हिंदी चित्रपटात रितुपर्णा राजपाल यादवसोबत दिसली होती.



२०१३ मध्ये तिला कॅनडा एअरपोर्टवर रोखून धरण्यात आले होते. सहा तास तिची चौकशी झाली होती. विमातनतळ अधिकाºयांनी तिच्या व्हिसाची मुदत संपल्याचे सांगत तिला विमानतळावरूनच परत जाण्यास सांगितले होते.



१९९९मध्ये रितुपर्णाने तिला बालपणीचा मित्र संजय चक्रवर्तीसोबत लग्न केले. त्यांची दोन मुले आहेत.