Join us

राज्यसभेतील मोदींचे भावुक भाषण ऐकून रितेश देशमुखही झाला भावुक, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 16:52 IST

‘त्या भाषणाने मी... ’, ट्विट व्हायरल

ठळक मुद्देएका दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी आझाद यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते.

राज्यसभेत विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपला आणि सोमवारी त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे भावूक झालेत. आपल्या निरोपाच्या भाषणात मोदींनी  गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले. सोबत एक जुना किस्सा आठवत भावूकही झालेत. त्या घटनेबद्दल बोलताना मोदींना अश्रू अनावर झालेत. अभिनेता रितेश देशमुख याने संसदेतील या भावूक क्षणावर एक ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होतेय. केवळ इतकेच नाही सोशल मीडिया युजर्स यावर भरभरून कमेंट्सही करत आहेत.

‘गुलाम नबी आझाद साहेब राज्यसभेतून निवृत्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाने मी प्रचंड प्रभावित झालोय,’ असे ट्विट रितेशने केले आहे.रितेशच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या टिष्ट्वटचे आणि मोदींचे कौतुक केले आहे. तर काहींनी यानिमित्ताने मोदींवर टीकेची संधीही साधली आहे.

एका दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी आझाद यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. ‘ गुजरातच्या पर्यटकांवर जेव्हा काश्मीरात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हा सर्वात आधी गुलाम नबी आझाद यांचा फोन मला आला, तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांची जशी चिंता असले तशी चिंता गुजरातच्या लोकांबद्दल आझाद यांना होती. या हल्ल्यात 8 लोक मारले गेले होते, तेव्हा प्रणब मुखर्जी संरक्षण मंत्री होते, मी त्यांना या पर्यटकांचे मृतदेह गुजरातमध्ये आणण्यासाठी संरक्षण खात्याच्या एअरप्लेनची मागणी केली, प्रणब मुखर्जी यांनी सांगितले चिंता करू नका. रात्री खूप उशीर झाला होता, पुन्हा गुलाम नबी आझाद यांचा मला फोन आला. ते एअरपोर्टवर होते, आपल्या कुटुंबाप्रमाणे  त्या सदस्यांची काळजी घेतली...अशी चिंता...’, हे वाक्य नरेंद्र मोदी पूर्ण करू शकले नव्हते. त्यांना गहिवरून आले होते.

टॅग्स :रितेश देशमुखनरेंद्र मोदी