Join us
Daily Top 2Weekly Top 5

"१० वर्ष डेट केलं, पण कधीच एकत्र राहिलो नाही, लग्नानंतरच...", रितेश-जिनिलियाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:07 IST

१० वर्ष डेटिंग, पण एका छताखाली कधीच राहिले नाहीत; रितेश-जिनिलियाने जपलं 'ओल्ड स्कूल लव्ह', लग्नानंतरच्या 'त्या' पहिल्या अनुभवाबद्दल केला खुलासा!

Riteish Genelia Deshmukh : बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील 'पॉवर कपल' म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ओळखले जातात.  त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री, एकमेकांप्रतिचा आदर सर्वांची मने जिंकून घेतो. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. महाराष्ट्रातील चाहते तर त्यांना दादा-वहिनी म्हणून संबोधतात. नुकतंच त्यांच्या लग्नाला १४ वर्ष पुर्ण झाली आहेत. लग्नाआधी डेटिंगची १० वर्षे आणि लग्नानंतरची १४ वर्षे, असा एकूण २४ वर्षांचा हा त्यांचा प्रवास आजही तितकाच फ्रेश वाटतो.   नुकतीच या जोडीने टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी डेटिंगच्या काळात कधीच एकत्र राहिलो नसल्याचा खुलासा केलाय. जो ऐकून सानियासह चाहतेही चकित झाले आहेत.

आजच्या काळात 'लिव्ह-इन रिलेशनशिप' ही गोष्ट सामान्य मानली जाते. अनेक कलाकार हे लग्नाआधी एकत्र राहून पाहतात.  मात्र, रितेश आणि जिनिलियाने लग्नाआधी एक वेगळाच आदर्श जपला. रितेशने सांगितले की, "आम्ही लग्नाआधी १० वर्ष एकमेकांना डेट करत होतो, पण त्या संपूर्ण काळात आम्ही कधीही एकत्र राहिलो नव्हतो".

रितेशने पुढे स्पष्ट केले की, "आम्ही अनेकदा सुट्ट्या घालवण्यासाठी बाहेर गेलो किंवा चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात एकत्र असायचो. कधी मित्रांसोबत ट्रिपला गेलो तरीही आमच्या रूम्स कायम स्वतंत्र असायच्या. आम्ही कधीही हॉटेलमध्ये एकत्र रूम शेअर केली नाही. जेव्हा आमचं लग्न झालं, तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकत्र राहिलो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने एक नवीन जीवन सुरू झालं".

रितेश-जिनिलियाची लव्हस्टोरी

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची पहिली भेट २००२ मध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. जिनिलियाने सुरुवातीला रितेशकडे दुर्लक्ष केलं होतं. रितेश हा श्रीमंत घरातील बिघडलेला मुलगा असल्याचं जिनिलियाला वाटायचं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी ते लग्नबंधनात अडकले. रितेश-जिनिलायाचं लग्न ख्रिश्चन आणि महाराष्ट्रीय अशा दोन्ही पद्धतीत झालं होतं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish-Genelia: Dated 10 Years, Lived Together Only After Marriage

Web Summary : Riteish and Genelia Deshmukh, married for 14 years after dating for 10, revealed they never lived together before marriage. They maintained separate rooms even on vacations, starting their life together after the wedding.
टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा