Join us
Daily Top 2Weekly Top 5

"और जिने को क्या चाहिए!" जिनिलीयासाठी रितेशची रोमँटिक पोस्ट, बॉबी देओल कमेंट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 18:21 IST

लग्नाच्या वाढदिवशी रितेशची जिनिलीयासाठी खास पोस्ट, बॉबी देओलच्या कमेंटने वेधलं लक्ष

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या दादा-वहिनींकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. आज रितेश आणि जिनिलीयाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. रितेशने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर जिनिलीयासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

रितेश-जिनिलीया नेहमीच्या त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. अनेक गमतीशीर व्हिडिओ पोस्ट करत ते चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. आता रितेशने लाडक्या बायकोसाठी रोमँटिक पोस्ट शेअर करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन जिनिलीयाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. "जेव्हा तुमचं जग तुमच्या हातात सामावतं...और जिने को क्या चाहिए. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको," असं रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

रितेशच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलनेही रितेशच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. "हॅपी अॅनिव्हर्सरी" असं म्हणत बॉबीने रितेश-जिनिलीयाला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, रितेश-जिनिलीयाने २०१२ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. 'तेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर रितेश-जिनिलीयाची पहिली भेट झाली होती. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुले आहेत. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाबॉबी देओल