Join us

अक्षय कुमार कुठून भरतो इतका मोठा टॅक्स? माहित नसेल तर रितेश देशमुखला विचारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:00 IST

परिणीतीने अक्षयला पैसे देतानाचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर रितेश देशमुख फिरकी घेणार नाही, हे शक्यच नाही. त्याने या फोटोवरुन अक्कीची चांगलीच फिरकी घेतली.

ठळक मुद्देरितेशने फिरकी घेतल्यावर अक्की कसा शांत बसणार. त्यानेही षट्कार ठोकला

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान अक्षय व परीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत परिणीती अक्षयला पैसे देताना दिसतेय. आता हे पैसे कशाचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अक्षय कुमारसोबत हरलेल्या पैजेचे. होय, ‘केसरी’च्या सेटवर फावल्या वेळात अक्षयसोबत लूडो खेळणे परीला चांगलेच महागात पडले. गेम कुठलाही असो, अक्षयला हरवणे तसेही सोपे नाही. पण परीला हे कळायला बराच वेळ लागला. मग काय, अक्षय जिंकला आणि परी प्रत्येक गेम हरली. अखेर अक्षयने गेममध्ये जिंकलेले पैसे परीला द्यावे लागले. पैसे देतानाचा फोटो परिणीतीने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला.

हा फोटो पाहिल्यानंतर रितेश देशमुख फिरकी घेणार नाही, हे शक्यच नाही. त्याने या फोटोवरुन अक्कीची चांगलीच फिरकी घेतली. ‘अक्षय टॅक्स कसा भरतो, हे या फोटोवरून तुम्हाला कळले असेलच. आम्ही सगळे को-स्टार्स त्याला यात मोठी मदत करतो’, असे त्याने लिहिले.

रितेशने फिरकी घेतल्यावर अक्की कसा शांत बसणार. त्यानेही षट्कार ठोकला. ‘थँक्यु रितेश. आज दुपारी तू काय करतोय. आपल्या दोघांत लूडोचा एक गेम झाला तर कसे राहिल?’, असे त्याने लिहिले. रितेश बिचारा यावर काय उत्तर देणार...‘नाही, तू डोळ्यांवर पट्टी बांधून खेळत असशील तर मी खेळेल,’ असे रितेशने लिहिले. शेवटी परिणीतीसारखे पैसे गमवायला कुणाला आवडेल?

 

टॅग्स :अक्षय कुमाररितेश देशमुखपरिणीती चोप्रा