Join us

'सितारे जमीन पर' रितेश देशमुखला कसा वाटला? पत्नी जिनिलियाचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:01 IST

बॉलिवूडमध्ये सध्या एका सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे Sitaare Zameen Par.

Riteish Deshmukh Reaction on Sitaare Zameen Par: बहुप्रतिक्षीत 'सितारे जमीन पर' हा चित्रपट आज (२० जून रोजी) जगभरात प्रदर्शित झाला आहे. 'तारे जमीन पर'चा सिक्वेल असलेल्या या चित्रपटात आमिर खान  (Aamir Khan)  व जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने आमिर खान आणि जिनिलिया देशमुख यांनी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. काल 'सितारे जमीन पर' सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंग शो पार पडला. यावेळी बायकोच्या यशात सहभागी होण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी रितेश देशमुखनेही हजेरी लावली होती.  रितेश देशमुखने 'सितारे जमीन पर' पाहून खास प्रतिक्रिया दिली आहे. 

रितेशनं नुकतंच  Faridoon Shahryar यांना मुलाखत दिली. यावेळी त्यानं पत्नी जिनिलियाचं कौतुक केलं. तो म्हणाला, "मी सिनेमा पाहिला आहे आणि खूपच कमाल सिनेमा आहे. मला या चित्रपटाचा अभिमान आहे. आमिर आणि जिनिलfयानं ज्या पद्धतीने अभिनय केला आहे, त्याचाही मला अभिमान आहे. तसेच या विषयावर असा चित्रपट बनवण्यासाठी खूप धाडस लागतं आणि याबद्दलही मला आमिर-जिनिलीया यांचा अभिमान आहे", या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या. 

रितेशनं दिलेल्या खास प्रतिक्रियेमुळे आता चाहत्यांची 'सितारे जमीन पर' पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 'सितारे जमीन पर' हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे.  या सिनेमातून दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल टीमची गोष्ट दाखवण्यात आली आहे.  

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाआमिर खान