Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट; प्रेम व्यक्त करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:12 IST

धीरज देशमुख यांच्या वाढदिवशी रितेश देशमुखनं दिल्या खास शुभेच्छा, जुना फोटो शेअर करत म्हणाला...

मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली 'लय भारी' ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. वडील कुशल राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असूनही रितेशनं आपला वेगळा मार्ग निवडला आणि सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. रितेशचे दोन्ही भाऊ अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत. आज धीरज देशमुख यांचा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या भावाला रितेशनं वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात.

रितेशचं आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. आपला धाकटा भाऊ धीरज यांच्याबरोबरचा फोटो रितेशनं शेअर केलाय. फोटोसोबत रितेशनं लिहलं, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धीरज. तू एक उत्कृष्ट मुलगा, वडील, नवरा, एक उत्तम मित्र आणि एक चांगला भाऊ आहे. आज आणि उद्या कायमच तुझ्याबरोबर सगळं चांगलं घडो, अशी मी प्रार्थना करतो. देव करो तू कायम निरोगी, आनंदी आणि यशस्वी राहावे". रितेशच्या या पोस्टवर चाहत्यांचा सेलिब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्यात. 

रितेशने राजकारणात एन्ट्री घेतलेली नसली तर तो कायम आपल्या दोन्ही भावांना साथ देत आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रितेश आपल्या दोन्ही भावांसाठी रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. रितेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या  'बिग बॉस मराठी ६' या रिअ‍ॅलिटी शोचं सुत्रसंचालन करताना दिसतोय. तसेच तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सतत काही ना काही गमतीशीर पोस्ट शेअर करत असतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish Deshmukh's heartfelt birthday wish for brother Dheeraj goes viral.

Web Summary : Riteish Deshmukh wished his brother Dheeraj a happy birthday with a touching post. He praised Dheeraj as a son, father, husband, friend, and brother, wishing him health, happiness, and success. Riteish actively supports his brothers' political careers and currently hosts 'Bigg Boss Marathi 6'.
टॅग्स :रितेश देशमुखधीरज देशमुख