२१ नोव्हेंबर २०२५ रोजी बॉलिवूडमध्ये दोन सिनेमे रिलीज झाले. त्यापैकी एक म्हणजे 'मस्ती ४' आणि दुसरा म्हणजे '१२० बहादुर'. दोन्ही सिनेमांचे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. एका सिनेमाचा विषय अॅडल्ट कॉमेडी आहे तर दुसऱ्या सिनेमाचा विषय देशभक्तीवर आधारीत आहे. या दोन्ही सिनेमांपैकी मंडे टेस्टमध्ये बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाने बाजी मारली. जाणून घ्या
मस्ती ४ की १२० बहादुर? बॉक्स ऑफिसची कमाईमध्ये कोण ठरलं श्रेष्ठ
फरहान अख्तरची दमदार अदाकारी असलेला '१२० बहादुर' सिनेमा चांगलाच गाजला. कमाईच्या बाबतीत या सिनेमाची सुरुवात संथ असली तरीही वीकेंडला '१२० बहादुर'सिनेमाला चांगलाच फायदा झालेला पाहायला मिळतोय. सोमवारी या सिनेमाने १.४० कोटींची कमाई केली. त्यामुळे चार दिवसांचं टोटल कलेक्शन बघता '१२० बहादुर'सिनेमाने ११.५० कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे 'मस्ती ४'बद्दल सांगायचं तर, हा सिनेमा आधीच्या तीन सिनेमांप्रमाणे अपेक्षित यश मिळवू शकला नाही. पहिल्या दिवशी २.७५ कोटी कमाई करणाऱ्या सिनेमाने रविवारी तीन कोटींचा व्यवसाय केला. याशिवाय सोमवारी या सिनेमाने १.५० कोटींचा व्यवसाय केला. त्यामुळे 'मस्ती ४'चं एकूण कलेक्शन १० कोटी इतकं झालं आहे. त्यामुळे 'मस्ती ४' मंडे टेस्टमध्ये पास झाला असला तरी कमाईच्या बाबतीत मात्र '१२० बहादुर'च्या मागेच आहे. एकूणच या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवता आले नाही.
Web Summary : Bollywood's 'Masti 4' and '120 Bahadur' released. '120 Bahadur' earned ₹1.40 crore on Monday, totaling ₹11.50 crore. 'Masti 4' earned ₹1.50 crore Monday, totaling ₹10 crore. '120 Bahadur' leads in box office collections.
Web Summary : बॉलीवुड की 'मस्ती 4' और '120 बहादुर' रिलीज़ हुई। '120 बहादुर' ने सोमवार को ₹1.40 करोड़ कमाए, कुल ₹11.50 करोड़। 'मस्ती 4' ने सोमवार को ₹1.50 करोड़ कमाए, कुल ₹10 करोड़। बॉक्स ऑफिस कलेक्शन में '120 बहादुर' आगे है।