रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटी आला. चित्रपट पहिल्या दिवसपासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घोडदौड सुरूच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या रितेश देशमुखनं नुकतंच एक भावनिक खुलासा केलाय, जो ऐकून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल आणि रितेश देशमुखची ग्रेटभेट झाली. या भेटीदरम्यान, रितेश म्हणाला, "मी शिवनेरीला गेलो होतो. सकाळी ६ वाजता. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. मी तिथे फक्त उभा होतो. आमच्या चित्रपटात दाखवलेला जो खोलीचा सीन आहे, त्या खोलीत मी गेलो. तिथे बसलो आणि पाहत होतो… कारण तो सीन आम्ही आधीच शूट केला होता".
पुढे तो म्हणाला, "मी तिथे बसून फक्त त्या खोलीकडे पाहत होतो आणि विचार करत होतो, आपण हा सीन शूट केला आहे, पण ही तीच खोली आहे, जिथे हा क्षण खरोखर घडला. तिथे थंड हवा वाहत होती आणि माझ्या मनात एकच विचार आला ही तीच हवा आहे, जिने कधीकाळी महाराजांच्या चरणांना स्पर्श केला असेल आणि आज तीच हवा माझ्या कपाळाला स्पर्श करत आहे. तो अनुभव खूपच अविस्मरणीय होता. २०-२३ वर्षांच्या कारकिर्दीत ५०-५५ चित्रपट केले असतील, पण अशी भावना फक्त याच चित्रपटासाठी आली".
रितेशचं बोलणं ऐकून विकी कौशलही भावुक झाला. तो म्हणाला, "मी तुझ्या भावना पूर्णपणे समजू शकतो. कारण गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो. तिथे गेल्यावर त्या क्षणांची पुन्हा कल्पना केल्याशिवाय राहवत नाही. असं वाटत राहतं की त्या काळातील एखादा मातीचा कण अजूनही तिथे असेल".
यावर रितेशने एक अत्यंत वैयक्तिक गोष्ट सांगितली, जी ऐकून चाहते भारावून गेले आहेत. रितेश म्हणाला, "मी शिवनेरीची माती माझ्यासोबत आणली आहे. मी एक छोटी काचेची बाटली घेऊन गेलो होतो. तिथली माती त्यात भरून आणली. आजही माझ्या देवघरात, देवांच्या बाजूला ती माती ठेवलेली आहे… ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला".
Web Summary : Riteish Deshmukh shared an emotional experience of visiting Shivaji's birthplace, Shivneri, and bringing back soil to keep in his prayer room. Vicky Kaushal resonated with the sentiment, recalling his visit to Raigad.
Web Summary : रितेश देशमुख ने शिवाजी महाराज के जन्मस्थान, शिवनेरी की यात्रा का एक भावनात्मक अनुभव साझा किया और अपनी प्रार्थना कक्ष में रखने के लिए मिट्टी वापस लाए। विक्की कौशल ने रायगढ़ की अपनी यात्रा को याद करते हुए इस भावना के साथ प्रतिध्वनित किया।