Join us

​रितेश करतोय कपड्यांची चोरी...सीसी टिव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 13:40 IST

एखाद्या कलाकाराविषयी सोशल मिडीयावर काही आगळी वेगळी पोस्ट पाहिली की प्रेक्षक त्याकडे जास्त आकर्षित होतात. असंच काहीसं घडलय रितेश देशमुखच्या बाबतीत.

एखाद्या कलाकाराविषयी सोशल मिडीयावर काही आगळी वेगळी पोस्ट पाहिली की प्रेक्षक त्याकडे जास्त आकर्षित होतात. असंच काहीसं घडलय रितेश देशमुखच्या बाबतीत.रितेश देशमुखचा कपड्याची चोरी करतानाचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. त्याची चोरी सीसी टिव्हीमध्ये कैद केली आहे. रितेश चोरी का करतोय? चोरी करावी लागेल असं नेमकं काय घडलय रितेशच्या बाबतीत?या व्हिडीयोमध्ये रितेश देशमुख कपडे चोरताना दिसतोय, तर यावरुन अशी शंका येते की हा व्हिडीयो प्रमोशनचा एक भाग तर नसेल ना? पण नक्की कोणत्या चित्रपटाचं प्रमोशन असेल हे रवि जाधवचा ‘बॅन्जो’ की ‘हाऊसफुल ३’?कोणत्या चित्रपटात रितेशचं चोराचं पात्र आहे , हा एक नवीन प्रश्न प्रेक्षकांना सतवत आहे. ‘ChorInTheStore’ हा हॅशटॅग या व्हिडीयोसाठी वापरला जात आहे.