Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर यांना मिळाले खास आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 17:15 IST

ऋषी कपूरने आपल्या अभिनयातून बॉलिवुडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. ऋषी कपूर यांनी भारतीय सिनेमाला दिलेल्या त्यांच्या योगदानासाठी ...

ऋषी कपूरने आपल्या अभिनयातून बॉलिवुडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. ऋषी कपूर यांनी भारतीय सिनेमाला दिलेल्या त्यांच्या योगदानासाठी इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबॉर्न या फेस्टिव्हलमध्ये त्यांना एक्सिलन्स इन सिनेमा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलचे हे सहावे वर्षं असून यावर्षी फेस्टिव्हलचा विषय हा स्त्री सक्षमीकरण आहे. या फिल्म फेस्टिव्हलला दरवर्षी वेगवेगळ्या कलाकारांना आमंत्रित करण्यात येते. आतापर्यंत अमिताभ बच्चन, अनिल कपूर यांसारख्या कलाकारांना या फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. यंदा ऋषी कपूर यांना खास आमंत्रण देण्यात आले असून त्यांचा तिथे विशेष सन्मान केला जाणार आहे.