Rishab Shetty Reviews Dhurandhar 2 :दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करत असतानाच, या चित्रपटाला आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचाही पाठिंबा मिळत आहे. 'कांतारा' फेम अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) याने 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. चित्रपटातील 'बारीक तपशीलांचे' त्याने तोंडभरून कौतुक केले आहे.
ऋषभ शेट्टीने आपल्या 'X' (ट्विटर) हँडलवर चित्रपटासाठी पोस्ट शेअर केली. तो म्हणाला, "'धुरंधर: द रिव्हेंज'चा अगदी पहिलाच प्रसंग तुम्हाला स्वतःकडे खेचून घेतो आणि शेवटपर्यंत बाहेर पडू देत नाही. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही एखाद्या युद्धाच्या नगाराच्या तालाप्रमाणेच अत्यंत प्रभावी आहे". ऋषभच्या मते, हा चित्रपट केवळ एक सिक्वेल नसून एक 'जबरदस्त मांडणी' आहे. आदित्य धर हा त्याच्या चित्रपटांमधील बारकाव्यांसाठी ओळखला जातोय. आदित्य धरला उद्देशून ऋषभने लिहिले, "मित्रा, मला चित्रपटातील 'डिटेलिंग' प्रचंड आवडले".
तगड्या स्टारकास्टचा प्रभावरणवीर सिंगच्या मुख्य भूमिकेसोबतच ऋषभने चित्रपटातील इतर कलाकारांच्या अभिनयाचीही प्रशंसा केली. अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्यासह संपूर्ण स्टारकास्टने दिलेला परफॉर्मन्स अत्यंत उत्कृष्ट असल्याचे त्याने नमूद केले. यापूर्वी अल्लू अर्जुन आणि महेश बाबू यांसारख्या दाक्षिणात्य सुपरस्टार्सनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
Web Summary : Rishab Shetty reviewed 'Dhurandhar 2', praising director Aditya Dhar's detailing and the film's captivating narrative. He lauded Ranveer Singh and the entire cast's performances, joining other South Indian stars in appreciating the movie's impact and storytelling.
Web Summary : ऋषभ शेट्टी ने 'धुरंधर 2' की समीक्षा करते हुए निर्देशक आदित्य धर की बारीकियों और फिल्म की मनोरंजक कहानी की प्रशंसा की। उन्होंने रणवीर सिंह और पूरे कलाकारों के प्रदर्शन की सराहना की, और फिल्म के प्रभाव और कहानी कहने की सराहना करने वाले अन्य दक्षिण भारतीय सितारों में शामिल हो गए।