Join us

"आईसाठी पूर्ण मजला, मला एक खोली...", रिद्धिमाने सांगितलं कसा आहे रणबीर-आलियाचा नवा बंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:14 IST

बंगल्याची किंमत माहितीये का?

रणबीर कपूर आणि आलिया भटचा नवा आलिशान बंगला तयार झाला आहे. मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात हा बंगला आहे. २५० कोटी इतकी बंगल्याची किंमत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या बंगल्याच्या बांधकामाचं काम सुरु होतं. आता अखेर ते पूर्ण झालं असून दिवाळीच्या मुहुर्तावर कपूर कुटुंब बंगल्यात शिफ्ट होतील अशी शक्यता आहे. रणबीर आलियाचा हा नवा बंगला नक्की कसा आहे याचं उत्तर रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरने दिलं आहे. 

फराह खान नुकतीच तिच्या युट्यूब शोनिमित्त रिद्धिमा कपूरच्या दिल्लीतील घरी गेली होती. रिद्धिमाचं दिल्लीतलं घर बघून फराह अवाकच झाली. नंतर फराहने रिद्धिमाला रणबीर-आलियाच्या मुंबईतील नव्या घराबद्दल विचारलं. तिथे तुझ्यासाठी किती जागा आहे असंही मजेत विचारलं. त्यावर रिद्धिमा म्हणाली, "हो माझ्यासाठी तिथे एक खोली आहे. बंगल्यातला एक पूर्ण मजलाच आईसाठी आहे. त्याच मजल्यावर मला एक खोली आहे. भरत आणि माझी एक खोली आहे. समायरासाठी एक रुम आहे. कारण माझ्या आईला आम्हाला तिच्याजवळ ठेवायचं आहे. आज आमच्यासाठी तीच सगळं काही आहे. तिला घेऊन बाहेर जायचं, ट्रिपला जायचं हे सगळं आम्ही करतो. आमचा मायलेकीचा बाँड खूप छान आहे."

रणबीर आणि आलियाच्या या ड्रीम होमची किंमत २५० कोटी रुपये आहे. ही प्रॉपर्टी आधी राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांची होती. १९८० च्या दशकात त्यांनी ती ऋषी कपूर आणि नीतू यांना दिली. आता ती वारसा हक्काने रणबीर-आलियाकडे आली आहे. लवकरच तो आलिया, राहा आणि आई नीतूसह या घरात शिफ्ट होणार आहे. 

टॅग्स :रिद्धिमा कपूररणबीर कपूरबॉलिवूडमुंबई