Bareilly Cantonment Church Controversy Christmas 2025 : नवीन वर्षाच्या आधी साजरा होणारा ख्रिसमस हा जगभरातील लोकांसाठी आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. ख्रिश्चन धर्माचा हा प्रमुख सण असला तरी, सर्व धर्मीयांकडून तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण, उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक अत्यंत तणावपूर्ण घटना समोर आली आहे. बरेलीच्या कॅन्टोन्मेंट परिसरातील एका चर्चबाहेर 'बजरंग दल' आणि 'विश्व हिंदू परिषद' (VHP) च्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत हनुमान चालीसाचे पठण केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर विविध स्तरांतून संताप आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणावर बॉलिवूडची बेधडक अभिनेत्री रिचा चड्ढा हिने व्यक्त केलेली प्रतिक्रिया सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.
नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले परखड मत मांडणाऱ्या रिचाने हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला. तिने या कृत्याचा निषेध नोंदवत 'बजरंग दल' आणि 'विश्व हिंदू परिषद' कार्यकर्त्यांवर खोचक शब्दांत ताशेरे ओढले. रिचा चड्ढाने आपल्या ट्विटरवर हा व्हायरल व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यावर उपरोधिक टिप्पणी केली. तिने लिहिले, "कधीकधी, स्वतःच्या सणांमध्येही भजन आणि कीर्तन करत जा.. भावांनो". रिचाच्या या विधानामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही लोक तिचं कौतुक केलंय. तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
रिचा चड्ढाचे आगामी प्रोजेक्ट्सकामाबद्दल बोलायचे झाले तर, रिचा चड्ढा २०२६ मध्ये "अभी तो पार्टी शुरू हुई है" या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, ती दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता यांच्या बायोपिकमध्येही मुख्य भूमिका साकारत आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर जुलै २०२४ मध्ये रिचानं मुलीला जन्म दिलाय.
Web Summary : Richa Chadha criticized a Hanuman Chalisa recitation outside a Bareilly church on Christmas. She sarcastically suggested focusing on own festivals. This sparked online debate. Chadha's upcoming projects include 'Abhi Toh Party Shuru Hui Hai' and a Silk Smitha biopic.
Web Summary : बरेली में क्रिसमस पर चर्च के बाहर हनुमान चालीसा के पाठ पर ऋचा चड्ढा ने नाराज़गी जताई। उन्होंने तंज कसते हुए अपने त्योहारों पर ध्यान देने को कहा, जिसपर सोशल मीडिया पर बहस छिड़ गई। ऋचा जल्द ही 'अभी तो पार्टी शुरू हुई है' और सिल्क स्मिता की बायोपिक में दिखेंगी।