Join us

सुशांत सिंग राजपूतच्या गर्लफ्रेंडने फोटो शेअर करत केलं बर्थ डे विश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 17:15 IST

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव-अफेअरच्या चर्चा जोरात आहेत.

बी-टाऊनमध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव-अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. दोघे सतत व्हॅकेशन, डिनर डेटवर एकत्र दिसतात. मात्र  हे नाते पब्लिक होऊ नये, यासाठी सुशांत व रियाने बरेच प्रयत्न केलेत. आज सुशांतच्या वाढदिवसाच्या दिवशी रियाने त्याला खूप स्पेशल पद्धतीने विश केले आहे. ट्विटरवर सुशांतसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यात दोघांची केमिस्ट्री दिसतेय. रियाच्या फोटोवर सुशांतने सुद्धा थँक्यू माय रॉकस्टार अशी प्रतिक्रिया दिली आहे. रियाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय.  

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. सर्वप्रथम अंकिता लोखंडे, मग क्रिती सॅनन, सारा अली खान. सध्या सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत असल्याची चर्चा आहे. आताश: हे नाते बरेच पुढे गेले आहे. अगदी लिव्ह-इनमध्ये एकत्र राहण्यापर्यंत. गेल्या काही दिवसांपासून सुशांत रियासोबत तिच्या घरी राहतोय. पण आता सुशांतला नवे घर शोधावे लागणार आहे. होय, सुशांतमुळे रियाला अडचणींचा सामना करावा लागतोय. रिया ज्याठिकाणी राहते, त्या फ्लॅटच्या मालकाला रियाने अन्य कुणासोबत फ्लॅट शेअर करण्यावर आक्षेप आहे. अपार्टमेंटच्या नियमानुसार, या फ्लॅटमध्ये केवळ एक व्यक्ती राहू शकते. अशात रिया व सुशांतला एकत्र एकाच फ्लॅटमध्ये राहणे कठीण जातेय. त्यामुळे, या कपलने नव्या घराचा शोध सुरु केला आहे.

क्रितीमुळे सुशांत व अंकिताचे ब्रेकअप झाले, असेही म्हटले गेले. पण कालांतराने हे नातेही संपले. आता सुशांत रियाच्या प्रेमात वेडा झाला आहे. त्याचे हे नाते किती यशस्वी होते, ते पाहणे आता इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती