Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतसोबतचा तो फोटो ठेवला व्हाट्सअॅप डीपी, पहा तो UNSEEN फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 10:43 IST

सोशल मीडियावर रिया आणि सुशांतचा हा फोटो व्हायरल होतो आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनला जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. 14 जून 2020 ही तारीख सुशांतचे फॅन्स कधीच विसरु शकणार नाहीत. त्यांच्या लडक्या अभिनेत्याने यादिवशी जगाचा निरोप घेतला. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतायेत. याच दरम्यान सुशांतचे कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा व्हाट्सअॅप डिपी व्हायरल होतो आहे. रियाने सुशांत सोबतचा एक कधी न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. रियाने डिस्प्ले पिक्चर म्हणून ठेवलेला हा फोटो खूपच सुंदर आहे, ज्यात सुशांत गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीकडे बघून हसताना दिसतोय तर रिया कॅमेऱ्याकडे पाहते आहे. दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. सोशल मीडियावर रिया आणि सुशांतचा हा फोटो व्हायरल होतो आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत जवळपास तीस पेक्षा जास्त जणांची चौकशी केली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यावर पोहचल्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार शनिवारी या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक टीमची भेट घेतली. पोलिसांशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये फॉरेन्सिक विभागाचा अहवाल मुंबई पोलिसांना देण्यात येईल. या प्रकरणी गरज भासल्यास आणखी काहींचे जबाब नोंदवला जाऊ शकतो. मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीतून कोणत्याही प्रकारची धक्कादायक माहिती समोर आलेली नाही. पण, तरीही आता अखेरच्या रिपोर्टकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत