Join us

सुशांत सिंग रजपूतच्या बहिणीबाबत रिया चक्रवर्तीने केला खळबळजनक खुलासा, वाचून बसेल धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 13:23 IST

या प्रकरणात सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती आणि तिच्या पतीचं नाव पुढे येत आहे.

ठळक मुद्देरियाने दावा केला आहे की, सुशांतची बहीण श्वेता आणि तिचा पती देखील अनेक वर्षांपासून ड्रग्सचं सेवन करतात. सुशांत माझ्या आयुष्यात येण्यापूर्वीपासूनच ड्रग्ज घेत होता.

सुशांत सिंग रजपूत मृत्यूप्रकरणी नवनवे खुलासे होत आहेत. एनसीबीने सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला काहीच दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्याच्या कूक आणि हाऊस हेल्परला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

या प्रकरणात सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती आणि तिच्या पतीचं नाव पुढे येत आहे. NCB द्वारे रियाची चौकशी सुरू आहे. असून तिनेे या दोघांचे नाव घेतले आहे. सुशांतची बहीण श्वेता आणि तिचा पती ड्रग्सचे सेवन करत असल्याचा आरोप रियाने लावला आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविकवर सुशांतला अंमली पदार्थांचं व्यसन लावल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी रियाची पुन्हा चौकशी करण्यात आली असून या प्रकरणात तिने श्वेता आणि तिच्या पतीचे नाव घेतले आहे. 

रियाने दावा केला आहे की, सुशांतची बहीण श्वेता आणि तिचा पती देखील अनेक वर्षांपासून ड्रग्सचं सेवन करतात. सुशांत माझ्या आयुष्यात येण्यापूर्वीपासूनच ड्रग्ज घेत होता. तो अंमली पदार्थांच्या पूर्णपणे आहारी गेला होता. याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना माहीत होते. मी त्याच्या आयुष्यात आल्यानंतर माझ्याकडून त्याला ड्रग्स मिळतील अशी त्याला आशा होती. त्याचे हे व्यसन सोडवण्याचा मी अनेकवेळा प्रयत्न केला. त्याने रुग्णालयात दाखल व्हावे असे मी त्याला अनेकवेळा सांगितले होते. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची बहीणच त्याला ड्रग्स पुरवायची.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत