Join us  

रिया चक्रवर्तीने कोर्टात सांगितलं, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटी करतात ड्रग्सचं सेवन....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 1:07 PM

बुधवारी तिच्या वकिलांनी कोर्टात जामिन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग्स चॅटींग समोर आल्यावर तपास करत असलेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मंगळवारी सायंकाळी रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. त्यानंतर बुधवारी रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तुरूंगात पाठवलं. बुधवारी तिच्या वकिलांनी कोर्टात जामिन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली.

मीडिया रिपोर्टनुसार, आपल्या जामिन याचिकेदरम्यान रियाने धक्कादायक दावा केला आहे. ती यावेली म्हणाली की, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटीज ड्रग्स घेतात. टाइम्स नाउच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, रियाने असाही दावा केला आहे की, तिच्यावर कोणत्याही एजन्सीने दबाव टाकला नाही.

दरम्यान, रिया चक्रवर्तीला एनबीसीने ड्रग्स खरेदी करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. तिला मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं होतं. एनबीसीने आपल्या तपासात दावा केलाय की, रिया चक्रवर्ती एका ड्रग्स सिंडिकेटची अॅक्टिव मेंबर आहे आणि सुशांतसाठी तिने ड्रग्स खरेदी केली होती.

दुसरीकडे रिया चक्रवर्तीला अटक झाल्यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या समर्थनात समोर आले आहेत. यात करीना कपूर, सोनम कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, स्वरा भास्कर, अभय देओल, अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यांनी रियाला सपोर्ट करणारे मेसेजे सोशल मीडियात शेअर केले आहेत.

कंगनानेही केला होता दावा

कंगना राणौतचं विधान रिया चक्रवर्तीच्या ड्रग चॅटनंतर समोर आला आहे जे एका न्यूज चॅनेलवर लीक झाले होते. ड्रग अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. इतकेच नाही तर एका रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, वीस टॉप बॉलिवूड आणि राजकीय नेत्यांची नावं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आली आहेत. आता याबद्दल कंगनाने दावा केला आहे की एकेकाळी बॉलिवूडमधील हाय और माइटी क्लबचा हिस्सा होती जिथे प्रत्येक दुसऱ्या पार्टीत सहभागी होत होती आणि तिथए प्रसिद्ध कलाकारांना ड्रग्स घेताना पाहत होती.

कंगना म्हणाली होती की, काही युवा कलाकार जे माझ्या वयाचे होते. ते वैयक्तिकरित्या ड्रग्स घेतात आणि शो करतात. या कलाकारांबद्दल ब्लाइंड आयटमदेखील लिहिले जात होते. डीलर सारखे असतात. सर्व काही एक प्रकारे हाताळले जाते. त्यांच्या पत्नीदेखील अशा पार्टी आयोजित करतात. तिथे पूर्णपणे वेगळे वातावरण असते. तिथे असे लोक भेटतात जे फक्त ड्रग्स घेतात आणि दुसऱ्यांसोबत दुर्व्यवहार करतात.

कंगना रानौत पुढे म्हणाली होती की, काही सरकारांनी या बॉलिवूडच्या ड्रग माफियांना पुढे जाण्यासाठी सहकार्य केले आहे. बॉलिवूड आणि ड्रग माफियांमध्ये रिलेशन आहे. ते एकमेकांना ओळखतात. सर्व एकच डीलर आणि पॅडलर्स आहेत. कलाकार ड्रग्सचे सेवन करतात. हे लोक घराणेशाहीला पाठिंबा देतात. त्यातील काही बालपणापासून ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत आणि मग ते अभिनेता किंवा दिग्दर्शक बनतात. या अभिनेत्यांपैकी एकाला मी डेट केले आहे. ते एका ठिकाणी जातात. ड्रिंकने सुरूवात करतात आणि मग एक रोल आणि एक गोळी मग ते नाकाने ओढतात. हे सगळे गुप्त संकेत असतात.

हे पण वाचा :

आम्ही तितके मूर्ख नाही...! रियाच्या बाजूने मैदानात उतरणा-यांना सुशांतच्या बहिणीने सुनावले

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

विचित्र योगायोग! रियाच्या अटकेनंतर व्हायरल होतेय तिचे 11 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट 

टॅग्स :रिया चक्रवर्तीअमली पदार्थबॉलिवूड