Join us
Daily Top 2Weekly Top 5

Love In Air : क्रितीनंतर सुशांत सिंगच्या आयुष्यात आलं नवी लेडीलव्ह, बर्थ डेला दिलं हे महागडं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 16:07 IST

अंकिता लोखंडेशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूतचे नाव क्रिती सॅननशी जोडण्यात आले होते. मात्र त्याचे हे नातं ही फारकाळ टिकले नाही

अंकिता लोखंडेशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूतचे नाव क्रिती सॅननशी जोडण्यात आले होते. मात्र त्याचे हे नातं ही फारकाळ टिकले नाही. सध्या सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. सुशांत रियाला डेट करत असल्याच्या अनेक बातम्या आल्या. 1 जुलैला रियाने आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. तिच्या बर्थ डेला तिला सुशांतने काय गिफ्ट दिले याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.   

आजतकच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंग राजपूतने आपल्या लेडीलव्हला प्लॅटिनमचे पेंडेंट गिफ्ट म्हणून दिले आहे. रियाला हे पेंडेंट खूप आवडलेदेखील आहे. रियाने हे पेंडेंट संभाळून ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग आहे. अद्याप दोघांनी आपलं नातं कधीच अधीकृत स्वीकारलेले नाही.   

काही दिवसांपूर्वी दोघे लद्दाखमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करायला गेले होते. इन्स्टाग्रामवर दोघांनी आपले फोटो शेअर केले आहेत. सुशांतने शेअर केलेल्या फोटोत त्याच्या बाजुला एक क्युट मुलगा बसलेला दिसतोय. त्याच मुलासोबत रियानेदेखील फोटो काढला आहे. यावरुन दोघे एकत्र व्हॅकेशनवर गेल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, सुशांत लवकरच 'छिछोरे'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची कथा मजेशीर असून या पोस्टरवर 'कुत्ते की दुम टेढ़ी, टेढ़ी की टेढ़ी' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. नितेश तिवारी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतक्रिती सनॉन