Join us

देर ना हो जाए या गाण्याचे गायक, कव्वालीचे बादशहा सईद साबरी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 18:57 IST

सईद साबरी यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ठळक मुद्दे21 एप्रिल रोजी सईद साबरी यांच्या मोठ्या मुलाचं देखील निधन झाले. त्यांच्या मुलाचं नाव फरीद साबरी असे होते.

सईद साबरी यांना कव्वालीचे बादशहाच म्हटले जात असे. त्यांनी एकाहून एक सरस गाणी गायली आहेत. सिर्फ तुम', 'देर ना हो जाए', 'इक मुलाकात जरूरी है सनम' ही त्यांची गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. सईद साबरी यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. 

सईद साबरी यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडला चांगलाच धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. 

21 एप्रिल रोजी सईद साबरी यांच्या मोठ्या मुलाचं देखील निधन झाले. त्यांच्या मुलाचं नाव फरीद साबरी असे होते. तरुण मुलाच्या निधनामुळे सईद साबरी यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासूनच त्यांची तब्येत बिघडली होती. फरीद साबरी आणि त्यांचे बंधू अमीन साबरी हे 'साबरी ब्रदर्स' या नावाने लोकप्रिय होते. त्या दोघांनी कव्वालीचे अनेक शो केले आहेत.