Join us

'मुल्क'च्या रिलीज आधीच तापसी पन्नूने वाढवले मानधन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 14:43 IST

बीटाऊनचे कलाकार सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाकडे सिनेमासाठी जास्त फिसची डिंमाड करतायेत. तापसी पन्नू हे इंडस्ट्रीमधले प्रसिद्ध नाव आहे

ठळक मुद्देतापसीने आपल्या सशक्त अभिनयाने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले

बीटाऊनचे कलाकार सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाकडे सिनेमासाठी जास्त फिसची डिंमाड करतायेत. तापसी पन्नू हे इंडस्ट्रीमधले प्रसिद्ध नाव आहे. तापसीने आपल्या सशक्त अभिनयाने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र अजून ही तिला हवे तसे यश मिळालेले नाही. तापसीने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या सिनेमांना रसिकांची ही पसंती मिळाली आहे. बॉलिवूड पेक्षा तापसी साऊथमध्ये जास्त फेमस आहे.      

तापसी पन्नूने 'चष्मे बहाद्दूर' या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र तिला खरी ओळख शूजित सरकार यांच्या ‘पिंक’ या चित्रपटातून मिळाली. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तापसी बॉलिवूडकडे वळली.  तापसीचे साऊथमधले चाहते तिचे हिंदी चित्रपट ही पाहतात. यामुळे कदाचित तापसीने बॉलिवूडच्या दिग्दर्शकांकडे जास्त मानधन मागते आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार तापसीला साऊथ ऐवढेच मानधन बॉलिवूडमध्ये ही हवे आहे. 

तापसीचा 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. यात ती पहिल्यांदाच ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 'मुल्क' हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. तापसी यात ऋषी कपूर यांच्या सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सामान्य माणसाचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. अनुभव सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. तसेच तापसी पुन्हा एकदा बिग बींसोबत सुद्धा काम करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे. 'बदला' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. याशिवाय 13 जुलैला तिचा 'सूरमा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.            

टॅग्स :बॉलिवूडऋषी कपूर