After the film, the work is done to make Tapi Pannu | चित्रपटानंतर तापसी पन्नू करणार हे काम

अनुष्का शर्मा आणि सोनम कपूरच्या पावलावर पाऊल ठेवायला आता तापसी पन्नू तयार झाली आहे. तापसी लवकरच एक क्लोथिंग ब्रँड लाँच करणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेत स्वत:चा ब्रँड बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे. याचे प्लॉनिंग ते गेले अनेक दिवस करते आहे. त्याचबरोबर अनेक प्रसिद्ध ब्रँडसने तापसीला एकत्र येण्याची ऑफर केली आहे. यावर्षाच्या अखेरिस ती आपला ब्राँड लाँच करु शकते. हा ब्राँड क्रिती सॅननच्या मिस टेकन या ब्रँडवरुन प्रेरित असण्याची शक्यता आहे.

सोनम कपूरची बहिण रिया कपूरचा सुद्धा रेसन हा ब्रँड मार्केटमध्ये खूप पॉप्युलर आहे. त्याचबरोबर अनुष्का शर्माने नुश ब्रँड बाजारात आला आहे. सलमान खानचा बीईंग ह्युमन हा ब्रँड तर सगळ्यांचा माहितीच आहे. त्यानंतर आता तापसी ही आपला ब्रँड बाजारात घेऊन येते आहे. 

तापसी पन्नूने चष्मे बहाद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तापसी बॉलिवूडकडे वळली. चित्रपट आणि मॉडेलिंगच्या जगात यशाच्या शिखरावर पोहोचलेली तापसी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. जुडवानंतर तापसी 'हॉकी पटू संदीप सिंग'च्या आयुष्यावर आधारित चित्रपट दिसणार आहे. लवकरच तापसी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात ती स्वत: एका हॉकी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करतो आहे. तापसी आगामी ‘दिल जंगली बंदेया’ या चित्रपटात बघावयास मिळणार असून, तिचा हा चित्रपट ९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: After the film, the work is done to make Tapi Pannu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.