Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rekha Birthday : 6 बहिणी 1 भाऊ तरी एकाकी आयुष्य जगते रेखा, इतक्या कोटींची आहे मालकीण...

By गीतांजली | Updated: October 10, 2020 11:04 IST

आज या रेखा यांचा वाढदिवस आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे नाव येताच डोळ्यासमोर तिचे 'इन आखों की मस्ती के ... मस्ताने हजारों है' हे गाणे. रेखा यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने करोडो चाहत्यांना वेड लावले. आज या सुंदर अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. रेखा आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करतायेत. विशेष म्हणजे वयाची 65 वर्षे ओलांडली असूनही रेखा यांचे सौंदर्य पाहून सारेच त्यांच्या प्रेमात पडतात. तरूण अभिनेत्रींनाही लाजवेल असे त्यांचे सौंदर्य आजही टीकून आहे.

रेखा यांचे चिरतरुण सौंंदर्यमुळात रेखा या वयातही इतके फिट आहेत यामागेही एक खास रहस्य आहे ते म्हणजे योग्य रितीने घेतलेला आहार . नियमितपणे योगा करणे आणि मेडीटेशन करण्याला त्या प्राधान्य देतात. याकडे त्या कधीच दुर्लक्ष करत नाही.  हे प्रत्येकालाच माहिती आहे की त्या रॉयल लाईफ जगतात. बऱ्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या सिल्कच्या महागड्या साड्या मौल्यवान दागिने परिधान केलेल्या दिसतात. 

रेखा यांच्याकडे आहे कोट्यवधींची संपत्तीरेखा यांनी आपल्या करिअरमध्ये 190 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. रेखा यांचा मुंबईतील वांद्रा परिसरात एक सुंदर बंगला आहे. रिपोर्टनुसार रेखा यांच्याकडे 200 कोटींची संपत्ती आहे. 

रेखा यांच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन आहे. रेखाशिवाय जेमिनी यांना एकूण सात मुलेमुली (6 मुली आणि 1 मुलगा) आहेत. त्यांची नावे विजया चामुंडेश्वरी, सतीश कुमार, राधा उस्मान सैयद, रेवती स्वामीनाथन, कमला सेल्वराज, नारायणी गणेश आणि जया श्रीधर अशी आहेत. रेखा यांनी अतिशय कमी वयात चित्रपटांमध्ये कामाला सुरुवात केलीय आणि त्यांच्या बहिणींनाही त्यांनी मदत केली आहे.

टॅग्स :रेखा