Join us

अशी होती रेखा आणि त्यांचे पती मुकेश अग्रवाल यांची प्रेमकथा, अशी झाली होती पहिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 17:13 IST

१९९० साली रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर मुकेश यांनी आत्महत्या केली होती.

ठळक मुद्देरेखा यांनी चित्रपटात काम करू नये अशी मुकेश यांची इच्छा होती. पण काही केल्या रेखा चित्रपटसृष्टी सोडायला तयार नव्हत्या.

बॉलिवूडमध्ये ८०च्या दशकातील प्रसिद्ध व सुंदर अभिनेत्री रेखा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजही त्या त्यांच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करतात. १९९० साली रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर मुकेश यांनी आत्महत्या केली होती.

रेखा यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील नेहमीच चर्चा रंगते. 1990 मध्ये रेखा यांनी लग्न करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मुकेश अग्रवाल या व्यवसायिकासोबत रेखा यांनी लग्न केले होते. मुकेश हे दिल्लीचे होते आणि त्यांची अनेक हॉटेल्स होती. रेखा आणि मुकेश यांची कॉमन फ्रेंडसच्या माध्यमातून ओळख झाली होती. रेखा आणि मुकेश यांनी जुहूतील एका देवळात लग्न केले होते. रेखा या प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी हे लग्न अतिशय साधेपणात करण्यात आले होते. या लग्नाला मोजून काहीच लोक उपस्थित होते. पण लग्नाच्या दोनच महिन्यात त्यांच्यात वाद व्हायला लागले असे म्हटले जाते. रेखा मुंबईत राहात होत्या तर मुकेश दिल्लीत राहात होते. पण रेखा यांनी दिल्लीला जाण्याचे प्रमाण खूपच कमी केले होते.

रेखा यांनी चित्रपटात काम करू नये अशी मुकेश यांची इच्छा होती. पण काही केल्या रेखा चित्रपटसृष्टी सोडायला तयार नव्हत्या. त्यामुळे लग्नाच्या सहाच महिन्यात रेखा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण या घटनेमुळे मुकेश डिप्रेशनमध्ये गेले होते असे म्हटले जाते. या घटनेनंतर काहीच महिन्यात मुकेश यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते.

टॅग्स :रेखा