Join us

न्यूड दृश्यामुळे एकेकाळी चर्चेत आलेली अभिनेत्री आज जगतेय हलाखीचे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:32 IST

या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका दिल्या आहेत.

ठळक मुद्देदस्तक या चित्रपटातील पोस्टरमध्ये त्यांना न्यूड दाखवण्यात आले होते. त्यांच्याकडे आज अजिबातच पैसे नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सिने अँड टेलिविजन आर्टिस्ट असोसिएशन दर महिन्याला त्यांना काही रुपयांची मदत करते.

1970 साली प्रदर्शित झालेला चेतना हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात प्रेक्षकांना रेहाना सुल्तान यांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. इशारा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील बोल्ड सीनची त्या काळात प्रचंड चर्चा झाली होती. रेहाना यांनी पहिल्याच चित्रपटात बोल्ड सीन दिल्याने त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. 

रेहाना यांचा काल म्हणजेच 19 नोव्हेंबरला वाढदिवस होता. रेहाना यांनी तिच्या कारकिर्दीत दस्तक, मन तेरा तन मेरा, एजंट विनोद, खोटे सिक्के यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. दस्तक या चित्रपटातील पोस्टरमध्ये त्यांना न्यूड दाखवण्यात आले होते. त्या काळातील त्या सगळ्यात जास्त बोल्ड अभिनेत्री होत्या असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. दस्तक या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना साहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांनी दिलेल्या बोल्ड सीनचीच नेहमी चर्चा रंगली. त्यांच्या या इमेजचा त्यांना देखील नंतरच्या काळात कंटाळा आला होता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दिग्दर्शक माझ्या अभिनयगुणांना वाव न देता केवळ बोल्ड सीनसाठी मला विचारतात. बाथटबमधले सीन अथवा पावसात भिजतानाचे सीन देऊन मला कंटाळा यायला लागला होता. त्यामुळेच मी अनेक चित्रपट नाकारत होती.

रेहाना या 34 वर्षांच्या असताना त्यांनी त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठ्या असलेल्या बीआर इशारा यांच्यासोबत लग्न केले होते. इशारा हे प्रसिद्ध दिग्दर्शक असले तरी त्यांनी नंतरच्या काळात चित्रपटसृष्टीपासून दूर राहाणे पसंत केले होते. त्यांचे निधन 2012 ला झाले. त्यानंतर रेहाना यांच्याकडे अजिबातच पैसे नव्हते. आर्थिक अवस्था अतिशय बिकट असल्याने सुधीर मिश्रा यांनी इनकार या चित्रपटात एक छोटीशी भूमिका त्यांना ऑफर केली होती. पण त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या. त्यांच्याकडे अजिबातच पैसे नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सिने अँड टेलिविजन आर्टिस्ट असोसिएशन दर महिन्याला त्यांना काही रुपयांची मदत करते.

टॅग्स :बॉलिवूड