Join us

म्हणून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला होऊ शकते जेल, ही आहेत कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 15:46 IST

गेल्या ८ वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखता. सुशांत माझा खूप चांगला मित्र असल्याचं तिने सांगितलं होतं. तसेच सुशांतच्या आत्महत्येपूर्वी महेश भट्ट यांनी रियाला सुशांतपासून लांब राहण्यास सांगितले होते.

सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक नव्या चर्चांना उधाण आले आहे. पोलीस देखील याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत याप्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती त्याच्या आत्महत्येमागचं ठोस कारण लागलेलं नाही. दरम्यान सुशांतची आणि रिया चक्रवर्ती एकमेकांना डेट करत असले तरी कधीच उघडपणे दोघांनी आपले नाते समोर आणले नव्हते. 

गेल्या  ८ वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखता. सुशांत माझा खूप चांगला मित्र असल्याचं तिने सांगितलं होतं. तसेच सुशांतच्या आत्महत्येपूर्वी महेश भट्ट यांनी रियाला सुशांतपासून लांब राहण्यास सांगितले होते. त्यानंतर रियाने सुशांतला सोडण्याचा निर्णय घेतला होता. यावरून असं समोर येत आहे की दोन महिन्यांपूर्वी पासून त्यांच्यात मतभेद होण्यास सुरूवात झाली होती. इतकेच नाही तर रिया ही सुशांतची बिझनेस पार्टनर होती.  तिने त्याचे आर्थिक नुकसान केले असल्याचेही चर्चा आहेत. रियाने सुशांतसह ब्रेकअप केल्यामुळे तो मानसिक तणावात गेल्याचेही बोलले जात आहे. हे सगळे आरोप सिद्ध झाले तर रिया चक्रवर्ती जलेची हवा खावी लागू शकते हे मात्र नक्की.

सुशांतच्या कुटुंबीयांकडून एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार या शोकसभेत कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीला सामील होण्यास परवानगी नाकारली होती. कुटुंबीय रियासोबत कंम्फर्टेबल नसल्यामुळे त्यांनी नकार दिल्याचा समजतंय.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीमहेश भट